कर्जमाफीसाठी जेलभरोमध्ये सहभागी व्हा
By Admin | Updated: September 11, 2015 23:09 IST2015-09-11T23:08:33+5:302015-09-11T23:09:07+5:30
जयंत जाधव : राष्ट्रवादी कॉँग्रेसची नाशिक

कर्जमाफीसाठी जेलभरोमध्ये सहभागी व्हा
रोडला बैठकनाशिकरोड : राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून केंद्र व राज्य शासनाला शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन आमदार व शहराध्यक्ष जयंत जाधव यांनी केले.
राष्ट्रवादी पक्षाकडून राज्यात दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी येत्या मंगळवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाची तयारी व रूपरेषा ठरविण्याबाबत राष्ट्रवादी नाशिकरोड विभागाची उत्सव मंगल कार्यालयात गुरुवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत आमदार जाधव यांनी दुष्काळ व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र-राज्य शासनाला जाग आणावी म्हणून आयोजित जेलभरो आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हावे, असे आवाहन केले. बैठकीचे सूत्रसंचलन मनोहर कोरडे व आभार बाळासाहेब मते यांनी मानले.
यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, निवृत्ती अरिंगळे, सुनीता निमसे, वंदना चाळीसगांवकर, कौसर तडवी, हरिष भडांगे, रमेश औटे, अशोक खालकर, नितीन चंद्रमोरे, विनोद देशमुख, सुरेश गायकवाड, वसीम शेख, विक्रम देशमुख, प्रशांत वाघ, मिलिंद पगारे, गिरीष मुदलियार, संजय बोडके, कन्नु ताजणे, प्रकाश साडे, संजय गायकवाड, रमेश अहेर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)