सिडको-अंबडमधील समाजबांधवही सहभागी

By Admin | Updated: September 25, 2016 01:21 IST2016-09-25T01:21:26+5:302016-09-25T01:21:54+5:30

मूक मोर्चा : दुचाकी, चारचाकींसह पायपीट करणाऱ्यांचीही गर्दी

Participants in SIDCO-Ambad participated | सिडको-अंबडमधील समाजबांधवही सहभागी

सिडको-अंबडमधील समाजबांधवही सहभागी

सिडको : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, मराठा समाजाला आरक्षण व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चासाठी सिडको-अंबड व परिसरातील लाखोंचा जनसमुदाय मोर्चात सहभागी झाला होता. दुचाकी, चारचाकींसह पायपीट करीत समाजबांधव शिस्तीने जात असल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.
मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सिडको भागातून जास्तीत जास्त महिला व युवकांना सहभागी होण्याचे आवाहन बैठकीप्रसंगी करण्यात आले होते. त्यानुसार
आज सकाळी सहा वाजेपासूनच सिडको भागासह अंबड व परिसरातील समाजबांधव यात सहभागी झाले होते. हातात भगवा ध्वज व काळे टी शर्ट परिधान करीत समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते.
एक मराठा लाख मराठा अशा अशयाचा मजकूर टी-शर्ट, चारचाकींवर तसेच दुचाकीवर लावण्यात आले होेते. अनेक समाजबांधव, महिला व युवती यात सहभागी झाल्याचे चित्र बघावयास मिळत होते. मोर्चात लाखांच्या संख्येने गर्दी करीत समाजबांधव हे मोर्चात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रम करीत सहभागी झाले
होते.
सिडकोतील जुने सिडको, राणाप्रताप चौक, गोविंदनगर, गणेश चौक, विजयनगर, उत्तमनगर, सावतानगर, उपेंद्रनगर, त्रिमूर्ती चौक, शुभम पार्क, कामटवाडे, खुटवडनगर, उंटवाडी, केवळपार्क, डीजीपीनगर, अंबडगाव, फडोळमळा, दातीरमळा यांसह परिसरातून हजारोंचा जनसागर मोर्चात सहभागी झाला होता. (वार्ताहर)
उत्तमनगर येथून बसची व्यवस्था

मोर्चात सहभागी होण्यासाठी सिडको भागातून समाजबांधव मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी होत होती. मोर्चाच्या ठिकाणी जाण्यासाठी चारचाकी, दुचाकी गाडींची व्यवस्था करण्यात आली होती, तर उत्तमनगर येथून महिला व लहान मुलांसह समाजबांधवांसाठी बसची व्यवस्था करण्यात
आली होती. तसेच सिडको भागातील अनेक समाजबांधव, महिला या पायपीट करीत मोर्चात सहभागी झाले होते.
४मोर्चाच्या ठिकाणी जाण्यासाठी सिडको भागातून समाजबांधव सहभागी होत होते, तर इगतपुरीकडून येणारी बहुतांशी वाहने ही उड्डान पुलावरून जात होती. विल्होळी, पाथर्डी, गवळाने, राजूर बहुला, दाढेगाव, परिसरातून समाजबांधव सहभागी झाले होते.या मोर्चात शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात वृद्ध, महिला व युवतींचा सहभाग जाणवत होता. उड्डाण पुलावरून भगवे ध्वज फडकवीत वाहने मोर्चाच्या ठिकाणी जात होती.

Web Title: Participants in SIDCO-Ambad participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.