सुपर पॉवरचे प्रमुख संचालक पारखे दांपत्य नाशिकचे
By Admin | Updated: November 8, 2014 00:22 IST2014-11-08T00:21:08+5:302014-11-08T00:22:05+5:30
सुपर पॉवरचे प्रमुख संचालक पारखे दांपत्य नाशिकचे

सुपर पॉवरचे प्रमुख संचालक पारखे दांपत्य नाशिकचे
नाशिक : सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीची विदर्भात स्थापना करून फसवणूक करणारे कंपनीचे प्रमुख संचालक दीपक पारखे व दिव्या पारखे हे मूळचे नाशिकचे असून, त्यांचे हिरावाडीतील गुंजाळनगर येथे घर आहे़ हिंगोली, नांदेड, यवतमाळ, परभणी तसेच विदर्भातील अनेक गुंतवणूकदारांनी कमी कालावधीत दामदुप्पट होण्याच्या आशेने पाच हजारांपासून ते पाच लाखांपर्यंतची कंपनीत गुंतवणूक केली़ सुरुवातीला परतावा तर काहींना धनादेश देण्यात आले; मात्र ते न वटता परत येऊ लागल्याने नागरिकांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला़ गुंतवणुकीचे पैसे परत मिळत नसल्याने विदर्भातील काही गुंतवणूकदार जूनमध्ये नाशिकला आले होते़ पारखे कुटुंबीयांकडे गुंतविलेल्या पैशांची मागणी केली असता त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी पारखेने दिली होती़ आर्थिक परिस्थितीने बेजार असलेले व गंगेवर मुक्कामास असलेल्या विदर्भातील गुंतवणूकदारांनी पोलीस आयुक्तालयातील मोठ्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सत्य परिस्थिती कथन केली़ त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पंचवटी पोलिसांनी या गुंतवणूकदारांची संशयित दीपक पारखे, दिव्या पारखे व अन्य संचालकांविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली होती़