शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यात पार्किंगच्या जागा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 20:53 IST

अधिकाऱ्यांनी विविध पार्किंगच्या ठिकाणांची, तसेच रस्त्यांची पाहणी केली.

नाशिक (सुयोग जोशी) : लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबतचे नियाेजन सुरू करण्यात आले असून शुक्रवारी (दि. ७) आयुक्त तथा प्रशासनाधिकारी डॉ. अशोक करंजकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी विविध पार्किंगच्या ठिकाणांची, तसेच रस्त्यांची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) प्रदीप चौधरी, नगररचनाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर, शहर अभियंता संजय अग्रवाल, इंजिनिअर संदेश शिंदे, इंजिनिअर जितेंद्र पाटोळे आदी सहभागी झाले होते. 

डोंगरे वसतीगृह, मिरची पॉईंटची जागा, पांझरापोळ, पेठराेडवरील जागा, पेठरोडवरील स्टेडियम, कुुसुमाग्रज उद्यान ते बाळासाहेब ठाकरे स्मृति संग्रहालय, रामवाडी पुलाला समांवर पशूवैद्यकीय हॉस्पिटलजवळील जागांची पाहणी करण्यात आली. त्यात कोणत्या जागांवर पार्किंग होवू शकते याबाबत तपासणी करण्यात आली. सिंहस्थासाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची मोठी जागा लागणार आहे. भारतातून येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता जागा अधिक लागू शकते, त्यामुळे जेथे जेथे मोकळी जागा अधिक मिळू शकते, त्याच ठिकाणांची पाहणी करण्यात आली. मात्र येत्या काळात इतरही पार्किंगच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व माहिती एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. तेथे तयार करण्यात आलेल्या शिखर समितीच्या सदस्यांकडे सदर कामांचा सविस्तर अहवाल सोपविला जाणार आहे.  शक्यतांची पडताळणीकुसुमाग्रज उद्यानापासून संपादित रस्त्याने मखमलाबाद रोड व त्या रोडवरील मिसिंग लिंकचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पेठरोडच्या सर्वच रस्त्यांबरोबरच सीता सरोवर म्हसरूळ येथील पौराणिक ठिकाणांची पाहणी करण्यात आली. शिवाय म्हसरूळ-वरवंडी रोडवरील कामांची आयुक्तांनी माहिती घेतली. याही रस्त्यावर भविष्यात काय काय कामे करता येतील त्याच्याही शक्यता पडताळण्यात आल्या.

टॅग्स :Nashikनाशिक