खासगी इमारतींना पार्किगचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:40+5:302021-02-05T05:42:40+5:30
सार्वजनिक ठिकाणी सर्रास धुम्रपान नाशिक: सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्याची मनाई असतानाही अशा ठिकाणी धुम्रपान केले जात असल्याचे दिसते. अशा ...

खासगी इमारतींना पार्किगचा वेढा
सार्वजनिक ठिकाणी सर्रास धुम्रपान
नाशिक: सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्याची मनाई असतानाही अशा ठिकाणी धुम्रपान केले जात असल्याचे दिसते. अशा प्रकरणांवर कठोर कारवाई केली जात नसल्याने तसेच धुम्रपान करणाऱ्यांकडून अरेरावी केली जात असल्याने यंत्रणेतील कर्मचारी देखील कारवाई करण्यास सरसावत नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील कारवाई कमी झाल्याचे दिसते.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रीकडे दुर्लक्ष
नाशिक: शहरात अनेक ठिकाणी खाऊ गल्ली असून ठिकठिकाणी खाद्य पदार्थ विक्रीचे हातगाडे लावले जातात. या विक्रेत्यांकडे अनेक खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले जातात. अशा विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थांची तसेच त्यांच्या जागांची पाहणी करण्याची गरज आहे. काही ठिकाणी ग्राहकांच्या आरेाग्याशी खेळले जात आहे.
जात पडताळणी कार्यालयात अडवणूक
नाशिक: जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी स्वत: प्रयत्न करणाऱ्यांना अजूनही मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे. पालक आणि विद्यार्थी विनवणी करीत असतानाही त्यांना संबंधित विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पालक रडकुंडीला आले आहेत.कार्यालयात चकरा मारणाऱ्या पालकांना येथे कुणीही दाद देत नसल्याच्या तक्रारी पालक करीत आहेत.
टाकळी परिसरात पोलीस चौकी व्हावी
नाशिक: टाकळी परिसरात रात्रीच्या सुमारास वाहनधारकांना लुटणे तसेच बसेस अडविणे, ट्रक चालकाला मारहाण करून लूट करणे, गाड्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार काही टवाळखोर करीत आहेत. या प्रकाराबरोबरच अनेक गुन्हेगारी घटना या परिसरात घडत असतात. त्यामुळे या परिसरात पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
मेहरे सिग्लवर नियमांचा भंग
नाशिक: अशोकस्तंभाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी थेट सीबीएस सिग्नल पर्यंत जावे लागत असल्याने दुचाकीस्वार मेहरसिग्नलवर विरुद्ध दिशेने जिल्हाधिकारी कार्यालयात जात असल्याने इतर वाहनधारकांची देखील गैरसोय होते. अशा प्रकारे विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता असून अशा वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.