पाटोदा जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना पालकांचे निवेदन
By Admin | Updated: October 16, 2015 23:09 IST2015-10-16T23:08:35+5:302015-10-16T23:09:37+5:30
पाटोदा जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना पालकांचे निवेदन

पाटोदा जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना पालकांचे निवेदन
पाटोदा : येथील जनता विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे तीनशेहून अधिक असूनही या विध्यार्थ्यांना दोनच वर्गात दाटीवाटीने बसविले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून सदर विद्यालयात विध्यार्थ्यांना तीन ते चार वर्गात विभागून बसवावे व त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी पालक संघाचे अध्यक्ष कैलास घोरपडे, संपत बोरनारे व पालकांनी केली आहे .
येथील विद्यालयाला पालकवर्गाने भेट देऊन पाहणी केली असता १०० ते १५० विध्यार्थी एकाच वर्गात बसविले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षकांना विध्यार्थ्यांकडे लक्ष देता येत नाही व त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्र ार पालक वर्गाने केली तसेच शिक्षक पालक मेळाव्यात देखील या विषयावर चर्चा झालेली असून अद्यापही यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल तर शाळेला पालकांच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष कैलास घोरपडे व संपत बोरनारे यांनी सांगितले. या विषयी तत्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन विद्यालायाचे प्राचार्य सुरेश राख यांना देण्यात आले आहे. सदर अर्जाची प्रत म.वि.प्र. सरचिटणीस नीलिमा पवार, म.वि.प्र.संचालक अंबादास बनकर व पाटोदा स्कूल कमेटीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांना पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.अर्जावर कैलास घोरपडे, संपत बोरनारे, दिलीप बोराडे, मारु ती घोरपडे, वाल्मिक गायकवाड, दत्तू बोराडे, वाल्मिक बोराडे, दत्तूू भुसारे, विष्णू बोराडे, शिवाजी घोरपडे, राजू देशमुख आदींच्या स्वाक्षरी आहेत.