वैनतेय विद्यालयात माता-पिता स्मृतिदिन
By Admin | Updated: September 30, 2014 22:33 IST2014-09-30T22:33:16+5:302014-09-30T22:33:29+5:30
वैनतेय विद्यालयात माता-पिता स्मृतिदिन

वैनतेय विद्यालयात माता-पिता स्मृतिदिन
निफाड : विविध शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत असताना विद्यार्थ्यांवर आदर्श संस्कार व्हावेत, आई-वडिलांप्रती अधिकाधिक संस्काराची बीजे रुजली जावीत या हेतूने आदर्श उपक्रमाचे आयोजन केले जाते. असाच समाजपयोगी उपक्रम गेल्या ३0 वर्षांपासून निफाड येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने राबवला जातो. तो उपक्रम म्हणजे माता-पिता स्मृतिदिन आयोजित करणे.
वैनतेय विद्यालयात आयोजित माता-पिता स्मृतिदिन कार्यक्रमप्रसंगी विक्रम महाराज काळे यांचे प्रवचन संपन्न झाले. याप्रसंगी व्यासपीठावर मंडळाचे कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड, संस्थापक विश्वस्त वि. दा. व्यवहारे, सचिव रतन पाटील वडघुले, भालचंद्र मोगल, प्राचार्य के. के. निकम, उपप्राचार्य व्ही. डी. अहेर, पर्यवेक्षक मालती वाघावकर, रेखा चौधरी, प्राचार्य मोरेश्वर पाटील, माजी प्राचार्य दिगंबर कुलकर्णी, एम. व्ही. जाधव, रामनाथ कराड, मुख्याध्यापक अलका जाधव, प्रसन्ना कुलकर्णी आदि उपस्थित होते. प्रारंभी विद्यालयाच्या गीतमंचने स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक वि. दा. व्यवहारे यांनी केले.(वार्ताहर)