मॉडर्न शाळेच्या मुख्याध्यापकांना पालकांचा घेराव

By Admin | Updated: July 13, 2016 00:23 IST2016-07-13T00:16:06+5:302016-07-13T00:23:00+5:30

शाळेभोवती तळे : उपाययोजनेची मागणी

Parenting Grounds to Modern School's Headmasters | मॉडर्न शाळेच्या मुख्याध्यापकांना पालकांचा घेराव

मॉडर्न शाळेच्या मुख्याध्यापकांना पालकांचा घेराव

सातपूर : अशोकनगर येथील मॉडर्न एज्युकेशन विद्यालयाच्या प्रांगणावर पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवारनंतर आज पुन्हा पालकांनी मुख्याध्यापकांना घेराव घालून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शनिवारी विद्यालयाच्या प्रांगणात पावसाचे पाणी साचल्याने पालकांनी शाळा व्यवस्थापनाला घेराव घातला होता. खड्डे बुजविण्यासाठी व्यवस्थापनाने कच आणली आहे. ही कच पसरविल्यानंतर पुन्हा चिखल तयार झाल्याने विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यास अडचण निर्माण झाली होती. संतप्त पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापकांना घेराव घातला. आठ दिवसांत परिस्थिती व्यवस्थित होईल, असे पालकांना आश्वासन देण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, संस्थेचे सचिव विश्वास ठाकूर यांनी रविवारी शाळेला भेट देऊन पाहणी केली आणि आणलेली कच पसरविण्यास सांगितले. परंतु या कचमुळे चिखल झाल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)मॉडर्न शाळेच्या मुख्याध्यापकांना पालकांचा घेरावशाळेभोवती तळे : उपाययोजनेची मागणीसातपूर : अशोकनगर येथील मॉडर्न एज्युकेशन विद्यालयाच्या प्रांगणावर पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवारनंतर आज पुन्हा पालकांनी मुख्याध्यापकांना घेराव घालून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शनिवारी विद्यालयाच्या प्रांगणात पावसाचे पाणी साचल्याने पालकांनी शाळा व्यवस्थापनाला घेराव घातला होता. खड्डे बुजविण्यासाठी व्यवस्थापनाने कच आणली आहे. ही कच पसरविल्यानंतर पुन्हा चिखल तयार झाल्याने विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यास अडचण निर्माण झाली होती. संतप्त पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापकांना घेराव घातला. आठ दिवसांत परिस्थिती व्यवस्थित होईल, असे पालकांना आश्वासन देण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, संस्थेचे सचिव विश्वास ठाकूर यांनी रविवारी शाळेला भेट देऊन पाहणी केली आणि आणलेली कच पसरविण्यास सांगितले. परंतु या कचमुळे चिखल झाल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Parenting Grounds to Modern School's Headmasters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.