नागालॅँड येथील निमलष्करी दलाचे
By Admin | Updated: October 10, 2014 01:32 IST2014-10-10T01:31:44+5:302014-10-10T01:32:49+5:30
नागालॅँड येथील निमलष्करी दलाचे

नागालॅँड येथील निमलष्करी दलाचे
सिन्नर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात शांतता अबाधित राहावी यासाठी नागालॅँड येथील निमलष्करी दलाचे सुमारे १०० सशस्त्र जवान सिन्नर शहरात दाखल झाले आहेत. या निमलष्करी जवानांसह सिन्नर पोलिसांनी शहरातून संचलन केले.येत्या १५ तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांवर निवडणूक कामात वाढता ताण लक्षात घेता नागालॅँड येथून १०० सशस्त्र निमलष्करी दलाचे जवान पाठविण्यात आले आहेत. (वार्ताहर)