आॅनलाइनच्या नावाखाली तलाठ्यांची दांडी

By Admin | Updated: March 31, 2016 23:24 IST2016-03-31T23:23:13+5:302016-03-31T23:24:54+5:30

आॅनलाइनच्या नावाखाली तलाठ्यांची दांडी

Panshiya Dandi in the name of online | आॅनलाइनच्या नावाखाली तलाठ्यांची दांडी

आॅनलाइनच्या नावाखाली तलाठ्यांची दांडी

आरोप : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तहसीलदारांना निवेदनइगतपुरी : तालुक्यातील बहुतांश तलाठी आपल्या सजेवर हजर राहत नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, आॅनलाइनच्या नावाखाली तलाठी तालुक्यात येत नसून नेहमी मोबाइल बंद ठेवतात. या तलाठ्यांनी आपली कामकाजाची कार्यपद्धत सात दिवसांच्या आत त्वरित बदलावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसू, अशा इशाऱ्याचे निवेदन तहसीलदार महेंद्र पवार यांना जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गोरख बोडके यांनी दिले आहे.
तहसीलदार महेंद्र पवार यांच्याकडे काल राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष फिरोज पठाण, शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव, उपसभापती पांडुरंग वारुंगसे, नगरसेवक यशवंत दळवी, उमेश खातळे, किरण मुसळे, वसीम सय्यद, माजी नगरसेवक विश्वनाथ
भोंडवे, शिवा काळे, पांडुरंग खातळे, विष्णू चव्हाण, चंद्रकात गतीर, पांडुरंग शेंडगे, बाळासाहेब धुमाळ
यांनी भेट घेऊन नागरिकांच्या व्यथा मांडल्या.
महसूल विभागाने सातबारा, आठ अ, खरेदीखत, वारसनोंद, फेरफार आदि जमिनीविषयी सर्वच कागदपत्रे आॅनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. परंतु बीएसएनएलच्या ब्रॉडबँडचा बेंडबाजा वाजत असल्यामुळे सर्वसामान्यांची कामे होण्यास विलंब होत आहे. आॅनलाइन झाल्यापासून सर्वच तालुक्यातील सर्वच तलाठी गायब होत असून, आपला मोबाइलही बंद ठेवतात. त्यामुळे विविध प्रकारचे दाखले वेळेत मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. (वार्ताहर)


महसूल विभागाला आपल्या आॅनलाइनचा हा सावळा गोंधळ दिसत आहे. मुळात महसूल जमा करणे, नोटीस देणे, चलन भरणे, निवडणूक याद्या दुरु स्त करणे, पंचनामा, आधार नंबर गोळा करणे, पीकपाण्याच्या नुकसानाचे पंचनामे आदि कामे कशी पूर्ण करणार हा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Panshiya Dandi in the name of online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.