दातलवाट परिसरात बिबट्याची दहशत

By Admin | Updated: August 30, 2016 00:50 IST2016-08-29T22:26:27+5:302016-08-30T00:50:12+5:30

मुसळगाव : बछड्यासह फिरत असल्याने शेतकामे खोळंबली

Panic Panic in Darwatwat area | दातलवाट परिसरात बिबट्याची दहशत

दातलवाट परिसरात बिबट्याची दहशत

मुसळगाव : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील दातलवाट भागात दोन बछड्यांसह बिबट्याचा मुक्त संचार असून, भरदिवसा शेतकऱ्यांना बिबट्या दृष्टीस पडत आहे. त्याच्या दहशतीमुळे शेतात काम करण्यासाठी कोणी धजावत नसल्याने कामे खोळंबल्याचे चित्र आहे.
१५ दिवसांपासून येथील दातलवाट भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. मक्याच्या शेतात खत टाकत असताना बबन शिंदे या शेतकऱ्याला बिबट्या दिसला. त्याच्यापासून अवघ्या काही
फुटांच्या अंतरावर बिबट्या झोपला होता. त्यानंतर दोनच दिवसांत बिबट्याने विजय शिंदे यांच्या वासरावर हल्ला करून ठार केले होते. यावर लगेचच वन विभागाने दातलवाट भागात देवनदी पात्राजवळ पिंजरा लावला आहे.
पाच-सहा दिवसांपूर्वी रावसाहेब कुऱ्हाडे शेतात काम करत असताना दोन बछड्यांसह बिबट्या दिसून आला. बछड्यांसह वावर असल्यामुळे सदर बिबट्या मादी असल्याचा अंदाज कुऱ्हाडे यांनी व्यक्त केला आहे. बिबट्याने अर्जुन कुऱ्हाडे यांच्या बैलाचाही काही काळ पाठलाग केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Panic Panic in Darwatwat area