कसबे सुकेणे:- येथील सहा नंबर चारी काझीचा मळा व पिंपरी शिवारात बिबट्याची दहशत असुन गेल्या सहा दिवसांपासून बिबटया पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत आहे. दरम्यान शेतक-यांच्या मागणीनुसार बिबटयाच्या मागावर वनविभागाने रविवारी काझीचा मळा याभागात पिंजरा लावला आहे. कसबे सुकेणे,कोकणात,शिरसगाव ,वडाळी पिंप्री या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबटयाचा संचार आहे. परिसरातील शेतक-यांच्या वस्तीवर ऊस,द्राक्षबागांमध्ये बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या असुन शेळ्या,कोंबड्या, बकरे, वासरी असे पाळीव प्राण्यांवर बिबट्या हल्ला चढवत आहे. सध्या शेतीची कामे सुरु असुन बिबट्याच्या संचारामुळे शेतकरीही भयभीत झाले आहेत. या परिसरातील एकनाथ चिंधु दयाळ यांच्या वस्तीवर येवला वनविभागाने पिंजरा लावला असल्याची माहिती शेतक-यांनी दिली. शेतक-यांना जीव मुठीत घेऊन शेतीकामे करावी लागत आहे. लहानमुलांच्या जिवीतास धोका झाला असुन वनविभागाने बिबटयाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाऊसाहेब मोरे , नितीन भंडारे , एकनाथ दयाळ, संदीप तिडके , बाळासाहेब भोज, लक्ष्मण घोलप यांनी केली आहे.आमच्या शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबटयाची दहशत आहे,वनविभागाला कळविल्यानंतर पिंजरा लावला आहे. राञी लाईट नसते त्यात बिबटयाची मोठी दहशत , दहा कोंबडे बिबटयाने ठार केले आहे.- भाऊसाहेब मोरे,शेतकरी ,कसबे सुकेणे
कसबे सुकेणे शिवारात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 18:38 IST
कसबे सुकेणे:- येथील सहा नंबर चारी काझीचा मळा व पिंपरी शिवारात बिबट्याची दहशत असुन गेल्या सहा दिवसांपासून बिबटया पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत आहे. दरम्यान शेतक-यांच्या मागणीनुसार बिबटयाच्या मागावर वनविभागाने रविवारी काझीचा मळा याभागात पिंजरा लावला आहे. कसबे सुकेणे,कोकणात,शिरसगाव ,वडाळी पिंप्री या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबटयाचा संचार आहे.
कसबे सुकेणे शिवारात बिबट्याची दहशत
ठळक मुद्देपाळीव प्राण्यांवर हल्ला : वनविभागाने लावला पिंजरा