पांगरीच्या तांगा शर्यत आयोजकांवर गुन्हा

By Admin | Updated: August 30, 2016 01:00 IST2016-08-30T01:00:04+5:302016-08-30T01:00:57+5:30

पांगरीच्या तांगा शर्यत आयोजकांवर गुन्हा

Pangari Tango Race Organizer | पांगरीच्या तांगा शर्यत आयोजकांवर गुन्हा

पांगरीच्या तांगा शर्यत आयोजकांवर गुन्हा

सिन्नर : तालुक्यातील पांगरी येथे घोडा-बैल तांगा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी पांगरी शिवारात घोडा-बैल तांगा शर्यत सुरू असल्याची माहिती वावी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांना शर्यत सुरू असल्याचे दिसले. मात्र पोलीस घटनास्थळी जाताच शर्यतीसाठी आलेल्यांनी पळ काढला. त्यापैकी एक तांगा, बैल-घोडा व पिकअप जीप पोलिसांनी ताब्यात घेतली, तर पाच पिकअप जीप व टेम्पोचा क्रमांक पोलिसांनी घेतला आहे. पैजेवर तांगा शर्यतीचे आयोजन करून बैलांना घोड्याबरोबर पळण्यासाठी लावणे प्रकरणी पोलिसांनी पांगरी येथील संशयित आबासाहेब वारुळे व त्याच्या अन्य सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हनुमंत कांबळे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Pangari Tango Race Organizer