वारकऱ्यांमध्ये दिसतो पांडुरंग
By Admin | Updated: July 3, 2015 00:04 IST2015-07-03T00:04:05+5:302015-07-03T00:04:23+5:30
वारकऱ्यांमध्ये दिसतो पांडुरंग

वारकऱ्यांमध्ये दिसतो पांडुरंग
महापौर : निवृत्तिनाथ पालखीचे स्वागतनाशिक : आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीचे गुरुवारी नाशिक शहरात सावरकर जलतरण तलावाजवळ महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे महापालिका स्वागताचे कर्तव्य भविष्यातही पार पाडणार असून, वारकऱ्यांमध्ये मला पांडुरंग दिसतो आणि त्यांच्या मनाची श्रीमंती पाहून मी भारावून गेलो आहे, अशा शब्दांत महापौर अशोक मुर्तडक यांनी आपल्या भावना यावेळी बोलताना व्यक्त केल्या.
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीचे स्वागत बॅँडपथकाच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी पालखीचे पूजन महापौर अशोक मुर्तडक व आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. याप्रसंगी झालेल्या छोटेखानी सोहळ्यात महापालिकेच्यावतीने ४० दिंडी प्रमुखांना तसेच निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे विश्वस्त यांचे भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, पंडित महाराज कोल्हे, जयंत महाराज गोसावी, रामभाऊ मुळाणे, लीलाताई लांडे, धनश्री हरदास, संजय महाराज धोंगडे, पद्माकर पाटील, मुरलीधर पाटील, मोहन बेलापूरकर, रामकृष्णबुवा लहवितकर, रामनाथ शिलापूरकर, विठ्ठल महाराज देहूकर, सुरेशकाका गोसावी, बाळकृष्ण डावरे, निवृत्ती नागरे, अविनाश गोसावी, सूर्यकांत रहाळकर, नरहरी उगलमुगले, दिलीप ताम्हणकर, सुधाकर काळे, उत्तमराव गाढवे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, गटनेते तानाजी जायभावे, संजय चव्हाण, उपआयुक्त दत्तात्रेय गोतीसे, सहायक आयुक्त डॉ. वसुधा कुरणावळ, नगरसेवक दामोदर मानकर आदि उपस्थित होते. प्रास्ताविक पद्माकर पाटील यांनी, तर सूत्रसंचालन गोपीनाथ हिवाळे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी मानले. यावेळी वारकऱ्यांच्या चहापान व नाश्त्याची सोय करण्यात आली होती. (प्रतिनिधी)