जय श्रीराम पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पंडित सोनवणे
By Admin | Updated: March 1, 2016 23:37 IST2016-03-01T23:37:08+5:302016-03-01T23:37:53+5:30
बिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी विठ्ठल आंबेकर

जय श्रीराम पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पंडित सोनवणे
सिन्नर : तालुक्यातील मनेगाव येथील जय श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पंडित रामभाऊ सोनवणे यांची, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल त्र्यंबक आंबेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. कासार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात संचालकांची विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदासाठी पंडित सोनवणे यांनी सादर केलेल्या अर्जावर सूचक म्हणून विठ्ठल आंबेकर, तर अनुमोदक म्हणून विठ्ठल बारकू सोनवणे यांनी स्वाक्षरी केली. उपाध्यक्ष पदासाठी विठ्ठल आंबेकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून अशोक गणपत शिंदे यांनी, तर अनुमोदक म्हणून तुकाराम रामभाऊ सोनवणे यांची स्वाक्षरी केली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने अध्यक्षपदी सोनवणे यांची, तर उपाध्यक्षपदी आंबेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी कासार यांनी केली. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून व्यवस्थापक नारायण सोनवणे यांनी काम पाहिले. यावेळी रामनाथ पांडुरंग सोनवणे, सुमन मधुकर सोनवणे, सिंधूबाई बाजीराव आंबेकर, अरुण शंकर जाधव, रुक्मिणी दत्तात्रय वैष्णव आदि संचालकांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)