सात वर्षांच्या श्रेयसची सायकलवर पंढरपूर वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:17 IST2018-07-31T23:15:53+5:302018-08-01T00:17:43+5:30
नाशिकहून निघालेल्या वारकऱ्यांसोबत साडेसात वर्षांच्या श्रेयस आव्हाड हादेखील सायकलवर या वारीत सहभागी झाला आणि त्याने नाशिक ते पंढरपूर सायकलवारी पूर्ण करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सात वर्षांच्या श्रेयसची सायकलवर पंढरपूर वारी
नाशिक : नाशिकहून निघालेल्या वारकऱ्यांसोबत साडेसात वर्षांच्या श्रेयस आव्हाड हादेखील सायकलवर या वारीत सहभागी झाला आणि त्याने नाशिक ते पंढरपूर सायकलवारी पूर्ण करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आषाढी एकादशीसाठी नाशिकहून निघालेल्या ५०० वारकºयांसोबत भल्या पहाटे श्रेयसची सायकलवारी सुरू झाली आणि नाशिक ते नानज हा पहिला टप्पा त्याने उत्साहात पार केला. येथील गावकºयांनी या चिमुरड्याचे स्वागत केले. सायंकाळी सहा वाजता तो नगर येथे पोहोचला. पुढील प्रवासाला सुरुवात झाली आणि त्याचा उत्साह आणखीनच वाढला. मजलदरमजल करीत वारकºयांसोबत विठू नामात रमलेला श्रेयस मुक्कामाच्या ठिकाणी झाडे लावण्याचादेखील संदेश देत होता. या चिमुरड्या श्रेयसने ३७२ कि.मी.चे अंतर सायकल चालवून पूर्ण केले. त्याच्या या धाडसाचे नाशिक सायकलिस्ट, वारकरी आणि त्याच्या सोबतीला असलेल्या असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी-देखील कौतुक केले. नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीण खाबिया आणि हरिष बैजल, राजहंस यांच्यासोबत श्रेयसने केलेल्या सायकल प्रवासाचे तो आवर्जुन वर्णन करतो.