मूल्यमापनाच्या वही खरेदीत ‘गडबड’ घोटाळा पंढरीनाथ थोरेंचा आरोप, २५ रुपयांची वही पावणे तीनशे रुपयांना?
By Admin | Updated: March 4, 2015 01:00 IST2015-03-04T00:59:26+5:302015-03-04T01:00:02+5:30
मूल्यमापनाच्या वही खरेदीत ‘गडबड’ घोटाळा पंढरीनाथ थोरेंचा आरोप, २५ रुपयांची वही पावणे तीनशे रुपयांना?

मूल्यमापनाच्या वही खरेदीत ‘गडबड’ घोटाळा पंढरीनाथ थोरेंचा आरोप, २५ रुपयांची वही पावणे तीनशे रुपयांना?
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या वार्षिक मूल्यमापनासाठी खरेदी करण्यात आलेल्या परीक्षण वहीसाठी विभागाने अव्वाच्या सव्वा दराने वह्यांची खरेदी करण्यात आल्याचा आरोेप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी केला असून, याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व शिक्षा अभियानाने एका विद्यार्थ्यांच्या वार्षिक मूल्यमापनासाठी तीन पानांसाठी ५५ रुपये २० पैसे असे एकूण पाच विद्यार्थ्यांचे मोजमाप असलेल्या एका पुस्तिकेसाठी चक्क २७६ रुपयांची वही खादी ग्रामोद्योग महामंडळाकडून विकत घेतले असून, जिल्'ातील तीन लाख विद्यार्थ्यांसाठी अशा ६० हजार पुस्तिका खरेदी केल्या आहेत, मुळात अशा पुस्तिकेसाठी बाजारात १५ रुपयांपासून २८ रुपयांपर्यंतचे दरपत्रक मागील वर्षीच मागविण्यात आल्याचे तसेच यावर्षी अशीच पुस्तिका शहरातील महात्मा गांधी रस्त्यावरील एका बुक डेपोत ४० रुपयांना उपलब्ध असताना ही २७६ रुपयांची एका वहीसाठी खरेदी कशासाठी? या खरेदीमागे नक्कीच घोटाळा असून, असाच प्रकार राज्यभर झाला असल्याची शक्यता असल्याने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे सर्व शिक्षा अभियानाला उपशिक्षणाधिकारी दर्जाचे पद गेल्या दोन-तीन वर्षांपासून रिक्त असल्यानेच विभागाचा कारभार असा सुरू असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)