पांडाणे प्राथमिक आरोग्यकेंद्र समस्यांच्या गर्तेत

By Admin | Updated: August 14, 2016 00:43 IST2016-08-14T00:42:50+5:302016-08-14T00:43:14+5:30

पांडाणे प्राथमिक आरोग्यकेंद्र समस्यांच्या गर्तेत

PANDAN Primary Health Center Problems | पांडाणे प्राथमिक आरोग्यकेंद्र समस्यांच्या गर्तेत

पांडाणे प्राथमिक आरोग्यकेंद्र समस्यांच्या गर्तेत

वणी : एकेकाळी चांगल्या कामगिरीबद्दल पुरस्कार प्राप्त
पांडाणे प्राथमिक आरोग्य
केंद्राच्या कारभाराची प्रचिती असमाधानकारक स्वरूपात रुग्णांना येऊ लागल्याने या केंद्राचे
कामकाज सुधरण्याची मागणी होत आहे.
दिंडोरी तालुक्यातील वणी -सापुतारा रस्त्यावर वणीपासून ५ किलोमीटर अंतरावर पांडाणे
प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत वणी, वणी-२, वणी-३, मुळाणे, अहिवंतवाडी,
अंबानेर, पांडाणे, हस्ते पिंप्री,
चौसाळे अशी दहा उपकेंद्रे
आहेत. या दहा उपकेंद्रांतर्गत ४५ हजार ३६५ लोकसंख्या कार्यकक्षेत येते. १४ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. परिसर स्वच्छता स्वच्छ पाणीपुरवठा रोग प्रतिबंधक उपक्र म आरोग्या विषयी जनजागृती प्रचार प्रसार तसेच रुग्णसेवेस अग्रक्र म याबाबींचा सेवेत अंतर्भाव आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा एकेकाळी नावलौकिक होता. डॉ. देशमुख सेवानिवृत्त झाले तेव्हापासून या केंद्रालाउतरती कळा लागली आहे. अस्वच्छ परिसर, वैद्यकीय घटकांची अनुपस्थिती, रुग्णसेवेसाठी विलंब, हलगर्जीपणा अशा प्रकारामुळे
संतप्त ग्रामस्थांनी कामकाज बंद पाडून याचा जाब विचारल्याची घटना ताजी असल्याने याबाबत उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे ( वार्ताहर )

Web Title: PANDAN Primary Health Center Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.