लोकमत न्यूज नेटवर्कपिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील आठ शेतकऱ्यांनी घेतलेले कोथिंबिरीचे बियाणे सदोष निघाल्याने कोथिंबिरीला तुरे (डोंगळे, फुले) आले असून, व्यापारी कोथिंबीर घेत नसल्याने या शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे तक्रार केली असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तालुका तक्र ार निवारण समितीने क्षेत्रीय भेट देऊन व पंचनामा करून शेतकऱ्याला त्याच्या नुकसानीचा अहवाल सादर केला आहे.तालुका तक्र ार निवारण समितीने क्षेत्रीय भेट अहवालात शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या कोथिंबीर पिकाचे वीस टक्के नुकसान झाले असल्याचे व त्याला त्याच्या उत्पादनात वीस टक्के घट येणार असल्याचे व त्याच शेतकऱ्याच्या शेतातील इतर कंपनीच्या कोथिंबीर पिकाची पाहणी केली असता त्या कोथिंबिरीला तुरे (डोंगळे, फुले) आलेली आढळली नसल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले असून, आता संबंधित बियाणे कंपनी व विक्रे ता यांच्यावर याबाबतीत काय कारवाई होते याकडे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. कोथिंबिरीचे बियाणे सदोष असल्याचे लक्षात आल्यावर शेतकरी विक्रे ता व बियाणे कंपनीचा प्रतिनिधी यांच्याकडे गेला असता शेतकऱ्याला दाद देऊ न लागल्याने जुनी बेज येथील शेतकऱ्यांनी कंपनीच्या विरोधात कळवण कृषी विभागाकडे तक्र ार केली होती व ‘लोकमत’ने शेतकऱ्याच्या या नुकसानीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. वृत्त प्रसिद्ध होताच तालुका तक्र ार निवारण समितीने शेतकऱ्याच्या शेतात येऊन संबंधित विक्रे ता व कंपनी प्रतिनिधी यांना बोलावून शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करत शेतकऱ्याला त्याच्या नुकसानीचा अहवाल सादर करून झालेला आहे.या तक्र ार निवारण समितीत कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ पी. बी. पाचनकर, तालुका कृषी अधिकारी जे. एम. शहा, विभागीय कृषी अधिकारी डी. जे. देवरे, कृषी अधिकारी ए. जी. बागुल, कंपनी प्रतिनिधी अभय चौधरी, विक्रे ता प्रतिनिधी अमित मालपुरे व तक्र ारदार शेतकरी यांच्या स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. प्रत्यक्ष भेट दिली असता तक्रारदार शेतकऱ्याच्या कोथिंबीर पिकात फुले (डोंगळे) असलेल्या झाडाची संख्या वीस टक्के आढळली व उत्पादनात वीस टक्के घट येणार आहे, असे नमूद केलेले आहे.यावेळी जुनी बेज येथील शेतकरी प्रशांत बच्छाव, मुरलीधर बागुल, प्रफुल्ल बच्छाव, भरत बच्छाव, रमेश बच्छाव, जगदीश बच्छाव, नरेंद्र बच्छाव, दीपक बच्छाव उपस्थित होते.
जुनी बेज येथील कोथिंबिरीचे पंचनामे
By admin | Updated: June 10, 2017 00:40 IST