पंचायत समिती सदस्याची गच्छंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:57 IST2017-08-23T00:57:46+5:302017-08-23T00:57:51+5:30
शासन नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून येणाºया सदस्याने कुठल्याही शासकीय आस्थापनावर राहू नये. तरीही बागलाण तालुक्यात एक पंचायत समिती सदस्य व एक सरपंचपदी अंगणवाडी सेविका, मदतनीस आढळून आल्याने गटविकास अधिकाºयांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत दोघा पदाधिकाºयांना सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास भाग पाडले आहे.

पंचायत समिती सदस्याची गच्छंती
सटाणा : शासन नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून येणाºया सदस्याने कुठल्याही शासकीय आस्थापनावर राहू नये. तरीही बागलाण तालुक्यात एक पंचायत समिती सदस्य व एक सरपंचपदी अंगणवाडी सेविका, मदतनीस आढळून आल्याने गटविकास अधिकाºयांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत दोघा पदाधिकाºयांना सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. पठावे दिगर गणाच्या सदस्य केदूबाई राजू सोनवणे यांनी आज सभापती आणि गटविकास अधिकाºयाकडे राजीनामा दिला आहे. या कारवाईमुळे सत्ताधारी गटाला चपराक बसली आहे. तालुक्यात महिला व एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदावर अकराशेहून अधिक महिला मानधनावर कार्यरत आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून बहुतांश सेविका, मदतनीस पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक लढवून स्थानिक स्वराज्य संस्थांचादेखील कारभार हाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासन नियमाची पायमल्ली करणाºया सेविकांची शोधमोहीम गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, महेंद्र कोर यांनी हाती घेतली आहे. पहिल्याच दिवशी दोन कारवाया करण्यात आल्या. त्यात केदूबाई सोनवणे आणि दुसºया कारवाईत बाभुळणे येथील अंगणवाडी सेविकेला सरपंच पदावर पाणी सोडावे लागले आहे. अंगणवाडी सेविका रेखा अहिरे या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्या होत्या.
संख्याबळ होणार कमी
४चौदा सदस्य असलेल्या बागलाण पंचायत समितीच्या सदस्यत्वाची गच्छंती झालेल्या केदूबाई राजू सोनवणे या दगडी साकोडे येथील रहिवाशी आहेत. त्या गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका म्हणून मानधनावर कार्यरत आहेत तर त्यांचे पती कोतवाल म्हणून नोकरीस आहेत. गेल्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत केदूबाई सोनवणे पठावे दिगर गणातून अपक्ष निवडून आल्या होत्या. निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसला रोखण्यासाठी त्यांनी सत्ताधारी भाजपाला पाठिंबा देऊन सत्तेत सामील झाले. सोनवणे चांगल्याच अडचणीत आल्या असून, त्यांनी मानधन मिळत असलेले सेविका पदावरच राहणे पसंत करत पंचायत समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.