पंचवटीत गावठी कट्टा जप्त
By Admin | Updated: February 10, 2017 00:26 IST2017-02-10T00:26:15+5:302017-02-10T00:26:31+5:30
पंचवटीत गावठी कट्टा जप्त

पंचवटीत गावठी कट्टा जप्त
नाशिक : मखमलाबाद शिवारातील पाटालगत गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या सातपूरच्या कामगारनगर येथील विधिसंघर्षित युवकास म्हसरूळ पोलिसांनी बुधवारी (दि़८) दुपारच्या सुमारास सापळा रचून अटक केली़ त्याचे दोन साथीदार फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे़
सातपूर व अंबड परिसरातील तीन संशयित गावठी कट्टा विक्रीसाठी मखमलाबाद शिवारात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार पाटालगत असलेल्या शासकीय फॉरेस्ट नर्सरीजवळ सापळा लावण्यात आला होता़ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हे तिघे संशयित आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता एक संशयित पोलिसांच्या हाती लागला, तर उर्वरित दोघे दुचाकीवरून पळून गेले़ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे दहा हजार २०० रुपये किमतीचे एक गावठी कट्ट व एक जीवंत काडतूस आढळून आले़ या प्रकरणी तिघा विधीसंघर्षित युवकांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)