पंचवटीत भुरट्या चोऱ्या सुरूच
By Admin | Updated: September 13, 2014 22:11 IST2014-09-13T22:11:16+5:302014-09-13T22:11:16+5:30
पंचवटीत भुरट्या चोऱ्या सुरूच

पंचवटीत भुरट्या चोऱ्या सुरूच
पंचवटी : परिसरात दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून, पोलिसांना भुरटे चोर पकडण्यास अपयश येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चार दिवसांपूर्वीच पंचवटीतील नवीन आडगाव नाका परिसरात एका चारचाकी वाहनाचे चारही टायर्स चोरून नेले. या घटनेनंतर पोलीस संशयिताला पकडून चोरी उघडकीस आणतील अशी अपेक्षा होती; मात्र पोलिसांना संशयित मिळून आले नाहीच. याशिवाय सकाळच्या वेळी नागरिकांच्या घरात घुसून घरातील रोकड तसेच भ्रमणध्वनी चोरून नेणे, दिंडोरीरोडवरील भाजीबाजारातून मोबाइल चोरी यांसारख्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. मात्र पोलिसांना आतापर्यंत संशयितांना पकडण्यास अपयश आलेले आहे. एकीकडे संपूर्ण पंचवटी परिसरात पोलीस सतत गस्त घालत असल्याचा दावा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून केला जात असला, तरी पंचवटीत भुरट्या चोऱ्या होत असल्याने पोलीस निरीक्षकांनी केलेला दावा फोल ठरत आहे. (वार्ताहर)