पंचवटीत खंडणीचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: October 21, 2014 01:58 IST2014-10-21T01:16:56+5:302014-10-21T01:58:05+5:30
पंचवटीत खंडणीचा गुन्हा दाखल

पंचवटीत खंडणीचा गुन्हा दाखल
नाशिक : गिरणी कामगारास मारहाण करून पैशांची मागणी करणाऱ्या एका संशयितावर पंचवटी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़ पेठ फाट्यावरील अक्षरधाम सोसायटीत संतोषकुमार छोटेलाल गुप्ता (३४) यांची पिठाची गिरणी आहे़ या गिरणीवर त्यांचा भाऊ हरीशकुमार व कारागीर सोनू सोनी हे काम करतात़ रविवारी सायंकाळी संशयित नंदू काळ्या (नवनाथनगर, पेठरोड, पंचवटी) हा गिरणीवर आला व त्याने दारूसाठी पैशांची मागणी केली़ त्यावेळी कारागीर सोनूने त्यास विरोध केला असता त्यास मारहाण करून पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ यानंतर त्याच्या खिशातील साडेसातशे रुपये काढून घेतले व यापुढे आल्यानंतर पैसे तयार ठेवायचे असा दम संशयित नंदू काळ्याने दिला़ या प्रकरणी संतोषकुमार गुप्ता यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ (प्रतिनिधी)