शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

पंचवटी पोलीस ठाण्याचे पालटले रूपडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:03 IST

पंचवटी : राज्यातील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यातील वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या तसेच आवारात अस्ताव्यस्त पडलेला पालापाचोळा हटवून साफसफाई करण्यात आल्याने पंचवटी पोलीस ठाण्याला झळाळी प्राप्त झाली आहे. गत जुलै महिन्यातील शुक्रवार, दि़ २८ रोजी पंचवटी पोलीस ठाण्यातील दुरवस्थेबाबत ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त पोलीस ठाणे हेच का? या आशयाचे ...

ठळक मुद्देराज्यातील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त पोलीस ठाणे वृक्षांच्या फांद्या, पालापाचोळा हटवून साफसफाई

पंचवटी : राज्यातील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यातील वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या तसेच आवारात अस्ताव्यस्त पडलेला पालापाचोळा हटवून साफसफाई करण्यात आल्याने पंचवटी पोलीस ठाण्याला झळाळी प्राप्त झाली आहे. गत जुलै महिन्यातील शुक्रवार, दि़ २८ रोजी पंचवटी पोलीस ठाण्यातील दुरवस्थेबाबत ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त पोलीस ठाणे हेच का? या आशयाचे वृत्त प्रसारित केले होते़ या वृत्ताची दखल घेण्यात आली असून, पोलीस ठाण्याचा आवार चमकू लागल्याने पोलीस कर्मचाºयांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे़आयएसओ मानांकन प्राप्त पंचवटी पोलीस ठाण्याची काही दिवसांपूर्वी दुरवस्था झाली होती़ पोलीस ठाणे आवारातील वाढलेल्या वृक्षांच्या फांद्यांमुळे पोलीस ठाण्याचा फलकही रस्त्यावरून दिसेनासा झाला होता़ तसेच पोलीस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या अपघातग्रस्त कार, पोलीस ठाणे आवारात पसरलेला पालापाचोळा यामुळे पोलीस ठाण्याला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते़ याबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसारित केले होते़लोकमतमधील वृत्त तसेच पोलीस आयुक्तांनीही अपघातग्रस्त वाहने हटविण्याबाबत केलेल्या सूचनांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी दखल घेऊन संपूर्ण पोलीस ठाण्याच्या आवाराची साफ सफाई, झाडांचा साचलेला पालापाचोळा तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात व बाहेर उभ्या असलेली अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम करून पोलीस ठाण्यातील बगीचा व कारंजाची सफाई करण्याचे काम करून घेतले आहे.पंचवटी पोलीस ठाण्याचे रस्त्याने जातानाही न दिसणारे फलक स्वच्छ करण्यात आले असून, थेट रस्त्यावरूनही पोलीस ठाणे सहजपणे दृष्टिक्षेपास पडते़ गत सलग चार ते पाच दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या साफसफाईचे काम सुरू होते़ पोलीस ठाणे आवारातील धूळखात पडलेली ग्रीन जीमही स्वच्छ करण्यात आली असून, एक नवीन झळाळीच यामुळे प्राप्त झाली आहे़ याबरोबरच पोलीस ठाण्यात कामानिमित्त येणाºया नागरिकांना वाहने अस्ताव्यस्तपणे न लावता रांगेत लावण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत़