पंचवटीत ‘गुरुपौर्णिमा’ उत्साहात

By Admin | Updated: July 31, 2015 23:51 IST2015-07-31T23:45:59+5:302015-07-31T23:51:54+5:30

भाविकांची गर्दी : मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

In the Panchavati 'Guruparnima' enthusiasm | पंचवटीत ‘गुरुपौर्णिमा’ उत्साहात

पंचवटीत ‘गुरुपौर्णिमा’ उत्साहात

पंचवटी : परिसरातील विविध ठिकाणच्या मंदिरात ‘गुरुपौर्णिमा’ उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्ताने भाविकांनी मंदिरात दर्शन करण्यासाठी गर्दी केली होती. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री कपालेश्वर महादेव मंदिर, साईबाबा मंदिर तसेच संत जनार्दन स्वामी आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.
गुरुपौर्णिमेनिमित्ताने विविध ठिकाणच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात येऊन विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात देवदेवतांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली होती. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून परिसरातील मठ, मंदिरात भजन तसेच प्रवचनाचे कार्यक्रम झाले. यावेळी भाविकांनी दर्शन, प्रसाद तसेच धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.
गंगाघाटावरील भाजीबाजारासमोर असलेल्या साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी गुरुंचे विधिवत पूजन, महाआरती करण्यात येऊन भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. श्रीकृष्ण तीर्थ आश्रम येथेही गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली.
जुना आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त पूजन हवन व भजन कीर्तनाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाविकांनी दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिराचे महंत भक्तिचरणदास महाराज यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विविध आखाड्यांचे साधू-महंत तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गंगाघाटावरील सांडव्यावरचे देवी मंदिर तसेच श्री नारोशंकर मंदिरात भाविकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनाचा लाभ घेतला. परिसरातील अनेक ठिकाणच्या छोट्या मोठ्या मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण पसरले होते.
सातपूर महाविद्यालय
नाशिक : मविप्र संचलित कला, वाणिज्य महाविद्यालयात गुरूपौर्णिंमा उत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील गुरू-शिष्य नात्याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना प्रकट केल्या. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: In the Panchavati 'Guruparnima' enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.