पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणीला विलंब
By Admin | Updated: October 10, 2015 23:19 IST2015-10-10T23:18:09+5:302015-10-10T23:19:01+5:30
पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणीला विलंब

पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणीला विलंब
नाशिकरोड : कल्याणजवळील अंबिवली-टिटवाळा दरम्यान शनिवारी सायंकाळी मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत होऊन दोन तास उशिराने रेल्वे धावत होत्या. पंचवटी एक्स्प्रेस अडीच तास, राज्यराणी दोन तास उशिराने धावत असल्याने नाशिककर प्रवाशांना मुंबई-ठाण्याहून परततांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.
मुंबईहून शनिवारी सायंकाळी निघालेली नंदिग्राम एक्स्प्रेस गेल्यानंतर कल्याणजवळील अंबिवली-टिटवाळा दरम्यान सायंकाळी ६.५० च्या सुमारास मालगाडीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने गाडी जागेवरच थांबली. यामुळे रेल्वे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. नंदिग्राम पाठोपाठ मुंबईहून येणारी पंचवटी एक्स्प्रेस ७.१५ वाजेच्या सुमारास कल्याण रेल्वेस्थानकांवर थांबविण्यात आली होती, तर तिच्या पाठीमागील राज्यराणी, विदर्भ आदि रेल्वे यादेखील टप्याटप्याने थांबविण्यात आल्या होत्या. रेल्वे ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून मुंबईतून मध्य रेल्वेमार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे यांना थांबवून ठेवण्यात आले होते. जवळपास पावणे दोन तास रात्री ९ वाजेपर्यंत कल्याण रेल्वेस्थानकावर थांबविलेली पंचवटी हळूहळू पुढे काढत पुन्हा अंबिवली येथे काही काळ थांबविण्यात आली होती. रात्री ८.५०च्या सुमारास मालगाडी बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. (प्रतिनिधी)