शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

पंचवटी विलंबाने धावल्याने ‘चेन पुलिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:05 AM

नाशिक : नाशिकरोड स्थानकावर सकाळी ७.१० वाजता पोहचणारी पंचवटी एक्स्प्रेस तब्बल एक तास उशिरा आल्याने संतप्त प्रवाशांनी दोनदा चेन पुलिंग केले. त्यामुळे अगोदरच विलंब झालेल्या गाडीला आणखीनच विलंब झाला. गाडीत गर्दी झाल्याने पासधारक आणि नियमित प्रवाशांना बसण्याला जागा नसल्यामुळे संतप्त प्रवाशांनी चेन पुलिंग केल्याचे बोलले जात आहे.  नाशिककरांसाठी संपूर्ण २१ ...

नाशिक : नाशिकरोड स्थानकावर सकाळी ७.१० वाजता पोहचणारी पंचवटी एक्स्प्रेस तब्बल एक तास उशिरा आल्याने संतप्त प्रवाशांनी दोनदा चेन पुलिंग केले. त्यामुळे अगोदरच विलंब झालेल्या गाडीला आणखीनच विलंब झाला. गाडीत गर्दी झाल्याने पासधारक आणि नियमित प्रवाशांना बसण्याला जागा नसल्यामुळे संतप्त प्रवाशांनी चेन पुलिंग केल्याचे बोलले जात आहे.  नाशिककरांसाठी संपूर्ण २१ नव्या डब्यांची पंचवटी एक्स्प्रेस नाशिककरांचा प्रवास सुखकर करील अशी अपेक्षा नाशिककर प्रवाशांना आहे. इंजिनसह नवीन गाडीचा वेग वाढविण्यात येऊन भविष्यात नाशिक-मुंबई अंतर आणखी कमी होऊ शकते असेही बोलले जाते; मात्र पंचवटी एक्स्प्रेसचे नियोजित वेळापत्रक न पाळण्याची परंपरा अजूनही सुरूच असून, पाच-दहा मिनिटे गाडीला विलंब होत आहे. सोमवारी (दि. ४) गाडीला तर तब्बल एक तास विलंब झाल्यामुळे  प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे नाशिकरोड ते देवळाली कॅम्प स्थानकादरम्यान दोन वेळेला प्रवाशांची चेन पुलिंग करीत गाडी रोखून धरली.  मनमाड येथूनच गाडीला विलंब झाल्यामुळे मनमाड आणि नाशिकरोड स्थानकातून नियमित प्रवाशांव्यतिरिक्तही अन्य प्रवासी मुंबईला जाण्यासाठी गाडीत बसल्याने गाडीत गर्दी झाली. त्यामुळे नियमित प्रवास करणारे प्रवासी आणि पासधारक प्रवाशांना बसण्यासाठीदेखील जागा न मिळाल्याने दोनदा चेन पुलिंग करण्यात आले. त्यामुळे अगोदरच विलंब झालेल्या गाडीला आणखी विलंब होऊ लागल्याने काही प्रवाशांनी हस्तक्षेप करून गाडी सुरळीत करण्यासाठी संबंधित प्रवाशांना समज दिली. दरम्यान, नवीन पंचवटी एक्स्प्रेसच्या आरामदायी सीट्स आणि बायोटॉयलेटबाबत प्रवाशांनी तक्रारीचा सूर लावल्याने अगोदरच पंचवटी गाडीच्या दुरुस्तीचा प्रश्न चर्चिला जात असताना, आता गाडीला विलंब होत असल्याची तक्रार येत असल्याने पंचवटी एक्स्प्रेसचे पुराण काही संपत नसल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे