शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी परिसरात महिलेची सोनसाखळी ओरबाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:26 IST

वृंदावननगर परिसरात एका पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबाडून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना शनिवारी (दि.२१) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पंचवटी : वृंदावननगर परिसरात एका पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबाडून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना शनिवारी (दि.२१) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयंत शंकर महाजन (रा. वृंदावननगर) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. जयंत हे त्यांच्या पत्नीसह परिसरातून पायी जात असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी जयंत यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाची १६ हजार रु पये किमतीची सोनसाखळी बळजबरीने हिसकावून पळ काढला. यामुळे महाजन यांच्या पत्नी पल्लवी महाजन यांच्या गळ्यालाही इजा झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास आडगाव पोलीस तपास करीत आहेत.आडगाव, पंचवटी व म्हसरूळ या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अद्यापही सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच असल्याने महिलांमध्ये भीती व्यक्त होत आहे. पायी जाणाऱ्या महिलांना चोरटे लक्ष्य करीत आहेत. महिला एकटी असो किंवा तिच्यासोबत कोणी पुरुष असले तरीदेखील चोरटे सोनसाखळी हिसकावून पोबारा करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आडगाव पोलीस ठाणे हद्दीत पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नव्याने विविध कॉलन्या, उपनगरे, गृहप्रकल्प उदयास आले आहेत.अल्पवयीन मुलीचा विनयभंगनाशिक : हिरावाडीतील मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी संशयित दिनेश सनान्से (१९, रा. पंचवटी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार पोलिसांनी संशयित दिनेशविरुद्ध विनयभंग व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून, पुढील तपास महिला उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.गुुंगीचे औषध पाजून विवाहितेवर अत्याचारनाशिक : नांदूर नाका भागातील एका महिलेस धमकी देत संशयित आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून याप्रकरणी पोलिसांनी संशयित बाळू गिरिधर जाधव याच्याविरुद्ध बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेसोबत असलेल्या ओळखीमुळे संशयित बाळू याने पीडितेला पाथर्डीफाटा येथील एका कॅफेत पाण्यामध्ये गुंगीचे औषध पाजून येथील एका हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताने तिचे मोबाइलवर चित्रीकरण व छायाचित्रे काढून ते सासरी व माहेरी व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक ए. के. जगताप हे करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी