पंचवटीत चौदा खंडणीखोर जेरबंद
By Admin | Updated: February 14, 2016 23:39 IST2016-02-14T23:28:51+5:302016-02-14T23:39:36+5:30
जागेचा वाद : धमकी देणाऱ्यांवर गुन्हा

पंचवटीत चौदा खंडणीखोर जेरबंद
पंचवटी : पेठ रोडवरील उन्नती शाळेच्या मागे असलेल्या म्हशीच्या तबेल्याची जागा खाली करण्यासाठी वृद्धेसह तिच्या कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या बिल्डरसह चौदा संशयितांवर पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणी, शिवीगाळ, दमदाटीचा गुन्हा दखल करण्यात आला असून, संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़ या जागेमध्ये स्वारस्य असलेल्या बिल्डरने पंचवटीतील काही सराईत गुन्हेगारांना पैसे देऊन हा प्रकार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात रत्नाकर विश्वनाथ कोठुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पेठरोडवरील उन्नती शाळेच्या पाठीमागे कल्पना पांडे यांची जागा असून, यावर कोठुळे यांचा म्हशीचा तबेला आहे. या जागेचे कोठुळे नियमित भाडे देत असून पांडे यांनी ही जागा २०११ मध्ये विक्र ी करून जागा खाली करण्यास सांगितले़ मात्र १९४७ पासून या ठिकाणी तबेला असल्याने कोठुळे यांनी जागा खाली करण्यास नकार दिल्याने पांडे यांनी भाडे घेणे बंद केले़