शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

पळसे: ऊसशेतीत बिबट्याचा भरदुपारी संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 17:33 IST

वनविभागाच्या पथकाने पिंज-याची जागा बदलून तत्काळ त्यामध्ये सावज ठेवत सापळा रचला. यावेळी आजुबाजूच्या परिसरातील रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देदीड वाजेच्या सुमारास गावकऱ्यांना दिले दर्शनशेतकाम करणा-या महिलांची धावपळ

नाशिक : पळसे शिवारातील टेंभी मळ्यात एमआयडीसी रस्त्याला लागून असलेल्या ऊसशेतीत बिबट्याचा भरदिवसा मुक्त संचार पहावयास मिळाला. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. लोकवस्तीला लागून असलेल्या ऊसशेतीत बिबट्या धुमाकूळ घालताना भर दुपारी लोकांना नजरेस पडला. यावेळी वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनाही बिबट्याचे दर्शन घडले.टेंभी मळ्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या शेवगेदारणा शिव रस्त्यालगत अंकुश कासार यांच्या घराच्या अंगणात खेळणा-या समृध्दीवर १० जूनरोजी रात्री बिबट्याने हल्ला केला; सुदैवाने या हल्ल्यात समृध्दीचे तीच्या आजीने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचले. या घटनेला दहा दिवसांचा कालावधी उलटत नाही, तोच पुन्हा बिबट्याने येथील ऊसशेतीत आश्रय घेतल्यामुळे नागरिकांमध्ये भय दाटून आले आहे. वनविभागाच्या कर्मचा-यांकडून सातत्याने दारणानदीचा काठ पिंजून काढत विविध गावांच्या पंचक्रोशीत पिंजरे लावण्यात आले आहेत; मात्र बिबट्या अद्याप जेरबंद कोणत्याही ठिकाणी होऊ शकलेला नाही. यामुळे बिबट्याला तत्काळ जेरबंद करावे, आणि थेट मोठ्या जंगलात नेऊन सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या गावापासून उत्तरेला मोहगाव, बाभळेश्वर अगदी तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे.

भरदिवसा बिबट्याने या ऊसशेतीतून बाहेर धूम ठोकत मोठ्या ऊसाच्या क्षेत्रात माणसांच्या उपस्थितीत भरधाव वेगाने पळत आश्रय घेतला. बिबट्याची धाव बघून अनेकांची पाचावर धारण बसली. यावेळी येथे उपस्थित वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, अनिल आहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे, उत्तम पाटील आदिंनी गावक-यांना बांधावर रोखून धरले.
बिबट्या पुन्हा ऊसशेतीत दडून बसल्यानंतर वनविभागाच्या पथकाने पिंज-याची जागा बदलून तत्काळ त्यामध्ये सावज ठेवत सापळा रचला. यावेळी आजुबाजूच्या परिसरातील रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. बिबट दिसल्यास त्याला कुठल्याहीप्रकारे डिवचण्याचा प्रयत्न करू नये, किंवा त्यामागे धावत सुटू नये अन्यथा बिबट अधिक चवताळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वनअधिका-यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्याwildlifeवन्यजीव