पळसेत पालखी मिरवणूक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST2021-02-23T04:21:09+5:302021-02-23T04:21:09+5:30

पळसे सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज याच्या स्मारकाचे पंचामृताने माजी उपसरपंच अनिल ...

Palkhi procession in Palset in excitement | पळसेत पालखी मिरवणूक उत्साहात

पळसेत पालखी मिरवणूक उत्साहात

पळसे सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज याच्या स्मारकाचे पंचामृताने माजी उपसरपंच अनिल गायधनी यांनी सपत्नीक अभिषेक करून विधिवत पूजन केले. त्यानंतर गावातून छत्रपती शिवरायांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत शिवप्रेमी हातात भगवे झेंडे घेऊन, तर महिलांनी भगव्या जरीचा काठ असलेल्या साड्या परिधान करून सहभागी झाल्या होत्या. पालखी मिरवणुकीच्या सांगतेनंतर दरवर्षीप्रमाणे गावातील मुस्लीम बांधवांनी शिवप्रेमींसाठी भोजनाचे आयोजन केले होते, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सुभाष गायधनी पालखी मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते.

शिवजयंती कार्यक्रमात पळसे सार्वजनिक जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष उमेश गायधनी, सरपंच सुरेखा गायधनी, उपसरपंच दिलीप गायधनी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, नवनाथ गायधनी, गणेश गायधनी, सुनील गायधनी, पोलीसपाटील सुनील गायधनी, अजित गायधनी, दीपक गायधनी, विजय सरोदे, निखिल गायखे, पंकज पेंढारकर, विशाल गायधनी, जुबेर पठाण, अनिल गायधनी, प्रिया गायधनी, शोभा गायधनी, किरण नरवडे, नाना चौधरी, किरण चंद्रमोरे, ईश्वर गायखे, बाळासाहेब सरोदे, वसिम शेख आदी सहभागी झाले होते. (फोटो २१ पळसे)

फोटो कॅप्शन

पळसे येथे शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत सहभागी झालेले शिवप्रेमी व महिला.

Web Title: Palkhi procession in Palset in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.