कालभैरव जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक
By Admin | Updated: December 4, 2015 00:06 IST2015-12-04T00:06:00+5:302015-12-04T00:06:30+5:30
कालभैरव जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक

कालभैरव जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक
नाशिक : कालभैरव जयंतीनिमित्ताने शहरातून परंपरेप्रमाणे पालखी काढण्यात आली. त्यानंतर गंगेवरील कालभैरव मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
गंगेवरील देवी मंदिराच्या पाठीमागील बाजूला असलेले मंदिर हे शेकडो वर्ष जुने आहे. मंदिरात दरवर्षी कालभैरव जयंती साजरी करताना राजेबहादूर यांच्या घरापासून कालभैरव प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. मात्र यंदा चांदीचा मुखवटा तयार करण्यात आला होता. या मुखवट्याची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. राजेबहादूर यांच्या निवासस्थापासून मेनरोड, दहीपूल मार्गे गंगेवर मूर्ती नेल्यानंतर दुपारी विविध धार्मिक विधी संपन्न झाले. यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. पालखी उत्सवात राजेश राजेबहादूर, तसेच राजेश पालखेडे तसेच सुदाम सोनवणे यांच्यासह अन्य भाविक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)