येवल्यात कालभैरवनाथ जोगेश्वरी माता जयंती उत्सवानिमित्त पालखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:11 IST2017-11-12T23:58:59+5:302017-11-13T00:11:28+5:30
ग्रामदैवत कालभैरवनाथ व जोगेश्वरी माता जयंती उत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवारी सकाळी कालभैरवनाथ मंदिरात सकाळी मूर्तीचा अभिषेक करण्यात आला.

येवल्यात कालभैरवनाथ जोगेश्वरी माता जयंती उत्सवानिमित्त पालखी
येवला : ग्रामदैवत कालभैरवनाथ व जोगेश्वरी माता जयंती उत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवारी सकाळी कालभैरवनाथ मंदिरात सकाळी मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. सजवलेल्या पालखीतून कालभैरवनाथ प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. गंगा दरवाजा, बुरु ड गल्ली, मेनरोड, आझाद चौक या शहरातील विविध भागातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. सत्यनारायण पूजन, भजनासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने नामजप, कालभैरवाष्टक आणि सामूहिक भजन घेण्यात आले.
शुक्रवारी रात्री संगीतमय भजनाचा कार्यक्र म झाला. कालभैरवनाथ संस्थान, राऊळ समाज बहुद्देशीय विकास संस्था यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजाचे सचिव रवींद्र राऊळ, शरद राऊळ, अंबादास राऊळ, बाळू राऊळ, संजय राऊळ, रवींद्र राऊळ, वाल्मीक सूर्यवंशी, मुकुंद पवार, विष्णू भालेरे, अर्जुन महाडिक, बळीराम भालेरे, दत्ता राऊळ, राकेश राऊळ, गणेश राऊळ, उत्तम राऊळ, चंद्रकांत राऊळ, विजय राऊळ, भावेश राऊळ, शोभा राऊळ, सुरेखा राऊळ, रेखा राऊळ, प्रियांका राऊळ, जयश्री राऊळ, संगीता राऊळ, दुर्गाबाई राऊळ, मनीषा राऊळ, वर्षा राऊळ आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाप्रसादाने कार्यक्र माची सांगता झाली.