पालेभाज्यांचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 22:55 IST2016-04-03T22:48:21+5:302016-04-03T22:55:22+5:30
पालेभाज्यांचे भाव कडाडले

पालेभाज्यांचे भाव कडाडले
खामखेडा : अवकाळी पावसामुळे उत्पादनात घटखामखेडा : चालू वर्षी प्रत्येक महिन्यात झालेला अवकाळी व बेमोसमी पाऊस, ठिकठिकाणी झालेली गारपीट, सतत ढगाळ वातावरण व कडक उन्हामुळे भाजीपाला उत्पादनात घट निर्माण झाल्याने भाजीपाल्याचे भाव कडाडले असून, सर्वसामान्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
दिवाळीनंतर प्रत्येक महिन्यामध्ये बेमोसमी पावसाने धुमाकूळ घातला. या बेमोसमी पावसाने शेतातील उभ्या पिकांसह भाजीपाला पिकांवर परिणाम झाला आहे.
अवचित येणारा पाऊस व कडक उन्हाच्या तडाख्यामुळे ग्रामीण भागातील भाजीपाला पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन भाजीपाल्याचे उत्पादन घटले असून, बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. पावसाचे दिवसेंदिवस प्रमाण कमी होत चालल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी घटत चालली असून, विहिरींचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याअभावी भाजीपाल्याच्या क्षेत्रात घट झाली आहे.
सध्या पालक, कोथ्ािंबीर, गवार, मेथी, शेपू आदि हिरव्या भाजीपाल्याची भाजीबाजारात आवक कमी झाली आहे. ग्रामीण भागात गावच्या आठवडे बाजारात गावातील लोक भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्र ीसाठी आणत असायचे त्यामुळे बाजारात स्थानिक भाजीपाला भरपूर मिळत असे. परंतु सध्या विहिरींना पाणी नसल्यामुळे स्थानिक विक्र ीसाठी येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण कमी झाले आहे. (वार्ताहर)