पाकिस्तानच्या निषेधार्थ निदर्शने

By Admin | Updated: July 13, 2017 00:32 IST2017-07-13T00:31:02+5:302017-07-13T00:32:20+5:30

पाकिस्तानच्या निषेधार्थ निदर्शने

Pakistan's protest demonstrations | पाकिस्तानच्या निषेधार्थ निदर्शने

पाकिस्तानच्या निषेधार्थ निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अमरनाथ यात्रेकरूंवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात येऊन पाकिस्तानच्या विरोधात घोेषणाबाजी करण्यात आली. सदरचा हल्ला हा कोणत्याही धर्मावर नाही तर तो देशावर झाल्याने सरकारने दहशतवाद्यांना धडा शिकवावा, अशी मागणीही करण्यात आली. आंदोलनात मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अजिज पठाण, संभाजी ब्रिगेडचे योगेश मिसाळ, प्रफुल्ल पाटील, माधुरी भदाणे, मुक्तार शेख, तुषार आंबोरे, इब्राहिम अत्तार, रफिक साबीर, सलीम मटेल, बशिर शेख, अर्शद शेख, अन्सार शेख आदी सहभागी झाले होते.

Web Title: Pakistan's protest demonstrations