राज्य शासन व महापालिका यांच्या संयुक्त निधीमधून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या सुशोभीकरण, वाहनतळ, क्लॉक टॉवर उभारणी आदी सहा कोटी २७ लाखांच्या विकासकामांना विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेत सभागृहात आंदोलन केले. ...
येथील महापालिकेच्या पवननगर जलकुंभातून गेल्या अनेक महिन्यांपासून एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाकडून बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार केला जात असल्याची बाब शिवसेना नगरसेवकांनी उघडकीस आणली . ...
गणेशोत्सवाकरिता मनपा, पोलीस प्रशासनाने लागू केलेल्या जाचक अटी, आर्थिक मंदी, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली उदासीनता यामुळे नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साह दिवसेंदिवस मावळू लागला आहे. ...
शहरातील पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावित असताना त्यांना कशाप्रकारे राजकीय हस्तक्षेपाचा त्रास सहन करावा लागतो, याचा हुबेहूब सजीव देखावा सिडकोतील प्रसादनगर येथील सिद्धिविनायक युवक मित्रमंडळाने साकारला आहे. ...
पंचवटीत यंदाही गणेश मंडळांनी पौराणिक तसेच धार्मिक देखावे भाविकांसमोर साकारले आहेत. यंदाच्या वर्षी जवळपास ८० हून अधिक छोट्या- मोठ्या मित्रमंडळांनी प्रशासनाकडे परवानगी घेतली आहे. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक, पौराणिक पुण्यनगरी-कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात पहावयास मिळत आहे. शहरातील पंचवटी हा परिसर प्रभू रामचंद्रांचा वनवासकाळात महत्त्वाचा राहिला आहे. ...
हरियाणा राज्यातील एका खेड्यातून अपहरण करण्यात आलेल्या दोन महिला व एका लहान मुलाची सरकारवाडा पोलिसांनी सुटका केली असून, अपहरणकर्ता संशयित अमोल सिंग यास अटक केली आहे़ ...
वेतनवाढीसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समितीने बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबवून संत कबीरनगर झोपडपट्टीलगत पाइपलाइन रोडवरील सुमारे ४० अनधिकृत पत्र्याचे शेड आणि वाढीव बांधकामे हटण्याची कारवाई केली आहे. ...