राज्यस्तरावरील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा नोव्हेंबर महिन्यात पार पडली. त्यानंतर इयत्ता दहावी राज्यस्तर परीक्षेत निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांची राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे दि. १२ मे ऐवजी दि. १६ जून २०१९ रोजी होणार आहे. ...
भामेश्वर, ता. बागलाण येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी दुपारी शिक्षण परिषद सुरू होण्याआधी रणरणत्या उन्हामुळे एका प्राथमिक शिक्षिकेला उष्मघाताचा झटका आल्याने त्यांना शिक्षकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. ...
शिक्षक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक आणि शिक्षकांकडे पैशाची मागणी केल्याच्या कारणात तथ्य आढळून आल्याने प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. ...
प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस) प्रणालीमध्ये तांत्रिक दुरुस्ती करून यापुढे बांधकाम, लघु पाटबंधरे तसेच पाणीपुरवठा विभागातील प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या मोजमाप पुस्तिकाही संगणकीकृत पद्धतीनेच करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ...
शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असून, आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना तंबी दिली ...
नाशिक शहरातून चारचाकी तसेच दुचाकी चोरी करीत आडगाव शिवारात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नानंतर पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील तिघा संशयित आरोपींची सात दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
आडगाव परिसरात कोणार्क नगर भागात दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी पाथर्डी फाटा परिसरातून इंडिका कार चोरून तिचाच वापर कोणार्कनगर येथे सराफाचे दुकानावर दरोडा टाकण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. ...
एनपीएचे वाढलेले प्रमाण नियंत्रणात आल्याने रिझर्व्ह बँकेने दि. २ एप्रिल २०१३ मध्ये श्री गणेश सहकारी बँकेवरील निर्बंध शिथिल केले असून, बँकेला दैनंदिन व्यावहार पूर्वीप्रमाणे सूरू करण्यास परवानगी दिलीआहे. ...
नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या निवडणुकीत गटबाजी चांगलीच उफाळून आली होती. या गटबाजीमुळेच निवडणुकीत तीन पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले, ...