नांदगाव तालुक्यातील साकोरा व मूळडोंगरी येथील दोन शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२६) सकाळी सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली. ...
निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने द्यायची, मतदारांच्या भावनांशी खेळून सत्ता हस्तगत करायची व सत्तेवर आले की, सारे विसरून जायचे अशाप्रकारे भाजपाने देशाची व राज्याची सत्ता हस्तगत केली असून, त्याच धर्तीवर सध्याच्या लोकसभा निवडणुकीला मोदी-शहा सामोरे जात आहेत. ...
मी मतदान करणारच अशा आशयाची शपथ शुक्रवारी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. स्विपचे नोडल अधिकारी योगेश सूर्यवंशी यांनी मनपा विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची शपथ दिली. यावेळी विभागीय अधिकारी डॉ. सुनीता ...
लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा अडकल्याने अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल पाच तास रस्त्यावर पडून राहिल्याची संतापजनक घटना घडली. ...
प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असल्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवार पायाला भिंगरी बांधल्यागत मतदारसंघ पिंजून काढत आहेत. शुक्रवारी सर्वांनीच गावागावांतील मतदारांच्या, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर भर दिला असल्याचे दिसून आले. ...
येथील विमानतळावर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे शुक्रवारी सायंकाळी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. संगमनेर (जि. नगर) येथील महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नियोजित सभेसाठी ओडिशातील बालासोर येथून राहुल गांधी यांचे ओझर विमानतळावर सा ...
शहराचे वातावरण शुक्रवारी कमालीचे उष्ण झाले होते. मागील चार वर्षांच्या हंगामाच्या उच्चांकी तापमानाची नोंद शुक्रवारी (दि.२६) मागे पडली. २०१६पासून अद्याप तापमानाचा पारा ४१ अंशांपार सरकल्याची नोंद नाही; ...
त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभपर्यंत दुतर्फा रस्त्याचे पायलट प्रकल्पांतर्गत स्मार्ट विकास साधला जात आहे. याअंतर्गत विकासकाम सीबीएस चौकापर्यंत येऊन ठेपले असून, या चौकाचे बांधकाम सुरू होणार असल्यामुळे शनिवारपासून (दि.२६) सीबीएस सिग्नलवरून सर्व प्रकारच्या वा ...
परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांचे अतिक्र मण झाल्याने अपघात वाढले आहे. विशेषत: शिवाजीवाडी व भारतनगरमधून गेलेला रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा अतिक्र मण वाढण्यास सुरु वात झाल्याने रोज छोटे-मोठे अपघात होते आहेत. ...
दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चालल्याने त्याचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झाला असून, दुपारच्या सुमारास तर बाजारपेठेत अघोषित संचारबंदी लावल्यासारखी स्थिती आहे. ...