बाजारात तूरडाळीचे दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना स्वस्तदरात तूरडाळ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविलेली ७२० क्विंटल तूरडाळ येत्या दोन दिवसांत जिल्ह्णात दाखल होणार असून, रेशनमधून कार्डधारकांना स्वस्तदरा ...
जेमतेम सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या कारभाराची चौकशी सहा सदस्यीस समितीने केली असली तरी, या चौकशीतून भुवनेश्वरी यांच्या पूर्वसुरींचाच दोष समोर येत असल्याने अशा चौकशीचा फार्स संब ...
जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या खेडगाव आणि गोवर्धन गटाच्या पोटनिवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसून आला. खेडगाव गटासाठी ४५, तर गोवर्धन गटात केवळ ४३ टक्के इतके मतदान झाले. ...
येवल्यात कांदा बाजारभावात घसरण सुरूच असल्याचे चित्र बुधवारीही बाजार समितीत दिसले. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात ५० ट्रॅक्टर, ४०० रिक्षा/पिकअपद्वारे गुरुवारी (दि.१२) एकूण ३००० क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांदा किमान २००० रु ...
महागठबंधनचे नगरसेवक एजाज बेग यांच्या घराच्या पार्किंगमध्ये घुसून फटाके फोडले व शिवीगाळ केल्याप्रकरणी जलील शेख व इतर १० ते १२ जणांविरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेवक यास्मीनबानो एजाज बेग यांनी फिर्याद दिली. ...
देवळा शहरातील नगरपंचायती समोरील चौकातील ऐतिहासिक पाच कंदिलाला वाहनाने धडक दिल्यामुळे बॅरिकेड्सचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी हानी टळली. यामुळे या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील टाकळी फाटा व तळेगाव रस्त्याच्या परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...
शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त निफाड तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि. १२) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...