शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. २१) १३१ नवीन बाधित आढळून आले आहेत. याशिवाय कोरोना आजारामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. ...
महानगरात बाधितांच्या संख्येने पुन्हा शतकी आकडा ओलांडत १०८पर्यंत मजल मारली. त्यामुळे नाशिक शहरातील बाधितांचा आकडा थेट १२०९ वर जाऊन पोहोचला आहे. नाशिक महानगरातील बळींमध्ये रविवारी पुन्हा सहा बळींची भर पडली. त्यामुळे शहरातील बळींचा आकडा ६२ वर पोहोचला आह ...
जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ज्यावेळी कोणत्याच शस्त्रक्रिया होत नव्हत्या, त्यावेळी नाशिक जिल्हा रुग्णालयात तब्बल ४,४५७ शस्त्रक्रिया पार पाडून जनसामान्यांना जीवनदान देण्यात आले आहे. या शस्त्रक्रियांमध्ये लहान, मोठ्या, गंभीर शस्त्रक्रियांसह सीझर पद ...
शहर, जिल्हा आणि आंतरजिल्हा अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आहे. गेल्या चार महिन्यांत नाशिक जिल्ह्याला सुमारे १२० कोटींचा ...
सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारातील कोलतीचा पाझर तलावाशेजारी एका शेतात दुपारी बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यात भीती व्यक्त होत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरीच्या रस्त्यावर मध्यभागी असलेल्या भातखळ्याजवळील मुक्तादेवीच्या मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास बिबट्याने एका गायीवर झडप घालून ठार केले. यासंदर्भात यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता गायीला बिबट्यानेच ठार केले असावे याबा ...
सायखेडा : तिसऱ्या पिढीत अलौकिक कारागिरीमुळे जगण्याचे साधन बनलेला घिसाडी समाजाचा लोहारकीचा व्यवसाय बदलत्या युगाच्या नांदीत अडचणीत येऊ लागला आहे. शासनाकडून समाजाची अवहेलना होत असल्याने प्रगत पिढी या व्यवसायाकडे काणाडोळा करीत असल्याची खंत लोहार व्यावसाय ...
नाशिक : खंडग्रास सूर्यग्रहणाच्या काळात सकाळच्या सुमारास भाविकांनी रामकुंडात स्नान केले तर नदीकाठावरही अनेकांनी जपतप केले. सूर्यग्रहण सुरू झाल्यापासून गोदाकाठ परिसरात मंत्रजापाचे स्वर घुमू लागले होते. भगवे, पांढरे वस्त्र परिधान केलेल्या साधू-महंताबरोब ...
नाशिक : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी पूर्ण केली आहे, मात्र सोयाबीनच्या उगवण- क्षमतेबाबत अनेक शेतकरी साशंक असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी सोयाबीन अगदीच पातळ उतरले असून, ...
जळगाव निंबायती : यंदाच्या वर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाच्या सरी वेळेत कोसळल्याने ग्रामीण भागातील गृहिणींची लोणचे बनविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे घरोघरी चटकदार कैरीच्या लोणच्याचा सुवास दरवळत आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत कैरीचे व त्या ...