एकमुखी दत्तमंदिरात पादुका पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 12:19 AM2020-07-06T00:19:56+5:302020-07-06T00:20:15+5:30

गुरु पौर्णिमेनिमित्त गोदा काठावरील श्री एकमुखी दत्तमंदिरात रविवारी (दि.५) सकाळी पादुकापूजन, अभिषेक श्री दत्तगुरुंची आरती, पूजापाठ आदींसह विविध धार्मिक विधी संपन्न झाले.

Paduka Pujan in Ekmukhi Datta Mandir | एकमुखी दत्तमंदिरात पादुका पूजन

गुरुपौर्णिमेनिमित्त गोदाघाटावरील श्री एकमुखी दत्तमंदिरात पादुकांचे पूजन करताना मंदिरातील पुजारी.

googlenewsNext

नाशिक : गुरु पौर्णिमेनिमित्त गोदा काठावरील श्री एकमुखी दत्तमंदिरात रविवारी (दि.५) सकाळी पादुकापूजन, अभिषेक श्री दत्तगुरुंची आरती, पूजापाठ आदींसह विविध धार्मिक विधी संपन्न झाले. दरम्यान, पहाटे श्री दत्तगुरू यांच्या मूर्तीची गुलाबपुष्पांच्या हारांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी मंदिरात गर्दी करू नये, असे आवाहनही विश्वस्तांकडून करण्यात आले होते. गुरुपौर्णिमेला श्री दत्तगुरूंचे दर्शन घेण्याची परंपरा असली तरी भाविकांना श्री दत्तगुरुं च्या मूर्तीचे दूर उभे राहूनच दर्शन घ्यावे लागले.

Web Title: Paduka Pujan in Ekmukhi Datta Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.