शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल किचनमधूनच पोळ्यांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:24 IST

पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या सेंट्रल किचन संस्थेकडून मिळणाºया पोळ्यांच्या तक्रारीनंतर विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन केले.

नाशिक : पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या सेंट्रल किचन संस्थेकडून मिळणाºया पोळ्यांच्या तक्रारीनंतर विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोळ्यांचा दर्जा सुधारण्यात आला असून, सेंट्रल किचनमधूनच विद्यार्थ्यांना पोळ्यांचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती आदिवासी विकास विभाग उपायुक्तांनी दिली.दरम्यान, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या पोळ्यांचा पुरवठा झाल्याचा दुजोरा गृहापालांनी दिला आहे. दरम्यान, असे असले तरी पोळ्यांच्या दर्जाचा प्रश्न झाल्यास शाळेतच पोळ्या बनवून देण्याचा पर्यायदेखील खुला ठेवण्यात आल्याचे समजते. एकलव्य आदिवासी निवासी शाळा व वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करत गेल्या सोमवारी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आदिवासी विकास विभागाची चांगलीच धावपळ झाली होती. सोमवारी रात्री आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त लोकेश सलामे, विद्यार्थी, वसतिगृह प्रशासन यांच्यात चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अटी भोजन पुरवणाºया संस्थेकडे मांडून वसतिगृहातच हाताने बनविलेल्या पोळ्या बनवून देणे तसेच रोज जेवणात दिल्या जाणाºया भाजीचा दर्जा सुधरविण्याच्या अटीवर मंगळवारी विद्यार्थ्यांशी पुन्हा चर्चा करण्यात आली.निकृष्ट अन्नाच्या दर्जाबाबत यापूर्वीदेखील विद्यार्थ्यांनी लेखी तक्रार केली होती. परंतु पोळ्यांचा दर्जा सुधारत नसल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. विद्यार्थ्यांच्या भूमिकेनंतर विद्यार्थ्यांनी पोळ्यांचा दर्जा सुधारण्याची मागणी केली. त्यानुसार आता पोळ्यांचा दर्जा सुधारण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त लोकेश सलामे यांनी दिली. त्यानुसार विद्यार्थ्यांना पोळ्यांचा पुरवठा सेंट्रल किचनमधूनच करण्यात आला. या पोळ्यांविषयी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती गृहपाल चौधरी यांनी दिली.अन्नाचा दर्जा राखण्याची मागणीविद्यार्थ्यांची तक्रार केवळ पोळ्यांविषयी होती. यात आता सुधारणा करण्यात आली असून, पोळ्याच ओलसर राहणार नाहीत यासाठी नव्याने पोळ्यांचे पॅकजिंग केले जात असल्याचे आदिवासी विभागाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना पोळ्या बनवून घेण्याबाबतचे आश्वासनदेखील देण्यात आले होते. त्यानुसार शाळेत पोळ्या बनवून देण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांनी एकमताने सेंट्रल किचनच्या पोळ्यांच्या दर्जाबरोबरच अन्नाचा दर्जा राखण्याची तीव्र मागणी केली. तूर्तास सेंट्रल किचन हाच पर्याय विद्यार्थ्यांनी स्वीकारला असला तरी भविष्यात यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. सध्या विद्यार्थ्यांना पोळ्यांच्या नव्या यंत्राच्या माध्यमातून पोळ्या बनवून दिल्या जात असल्याचे आदिवासी विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकfoodअन्न