पाचोरे खुर्द सरपंचपदी शीतल डोमाडे
By Admin | Updated: July 23, 2014 00:33 IST2014-07-22T22:02:04+5:302014-07-23T00:33:13+5:30
पाचोरे खुर्द सरपंचपदी शीतल डोमाडे

पाचोरे खुर्द सरपंचपदी शीतल डोमाडे
लासलगाव : पाचोरे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शीतल डोमाडे, तर उपसरपंचपदी छाया निकम यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गमे यांनी डोमाडे व निकम यांची निवड बिनविरोध घोषित केले. यावेळी सोसायटी अध्यक्ष गोपीनाथ उगलमुगले, माजी सरपंच शंकरराव उगलमुगले, कैलास सांगळे, भाऊसाहेब वाघ, बाबूराव डोमाडे, फकिरा सानप आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.