कोटमगाव जगदंबा यात्रेच्या तयारीला वेग

By Admin | Updated: September 29, 2016 01:18 IST2016-09-29T01:18:25+5:302016-09-29T01:18:53+5:30

येवला : तीन हजार भाविक बसणार घटी

The pace of preparations for Kottamgaon Jagdamba Yatra | कोटमगाव जगदंबा यात्रेच्या तयारीला वेग

कोटमगाव जगदंबा यात्रेच्या तयारीला वेग

येवला : तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या कोटमगाव स्थित माता जगदंबेच्या नवरात्र यात्रा उत्सवाच्या तयारीला वेग आला असून श्री जगदंबा माता देवस्थान ट्रस्ट तर्फे जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. १ आॅक्टोबर रोजी घट स्थापना होणार असून कोटमगाव यात्रा उत्सवास सुरवात होणार आहे.
घटस्थापना ते दसरा असे एकूण ९ दिवस कोटमगाव येथे दरवर्षी भरते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येतात. यंदा सुमारे ३ हजार भाविक नऊ दिवस घटी बसणार आहेत.
तीन वर्षापासून रखडलेला उड्डाण पूल यंदा मोटरसायकल, रिक्षा व पादचारी यांचेसाठी खुला होणार असल्याने भाविकांना वळसा घालून जाण्याची गरज नाही. त्यामुळे या वर्षी गर्दी वाढणार असल्याची चिन्हे आहे.
मात्र चार चाकी व मोठ्या वाहनांसाठी भाविकांना नागडे बायपास किंवा नांदेसर बायपास ने वळसा घालून कोटमगाव येथे दर्शनासाठी जावे लागणार आहे. नियंत्रणासाठी प्रशासनाची २६ सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर राहणार आहे. यात्रोत्सवासाठी १०० स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत.
पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी कोटमगाव येथील यात्रोत्सवाच्या पाशर््वभूमीवर देवस्थान विश्वस्त, ग्रामस्थ व विविध खात्याचे अधिकारी यांची बैठक घेऊन पोलीस प्रशासनाने कोटमगाव येथे रुग्णवाहिका, डॉक्टर, आणि अपंगांसाठी कुबड्या देणे, सामाजिक उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या. देवस्थान विश्वस्तांनी त्या मान्य केल्या. यामुळे भाविकांची सोय होणार आहे. पोलिसांच्या वतीने यात्रोत्सवासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे.
यात्रा परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने अतिशय काटेकोर पद्धतीने नियोजन केले असून खेळणी, सौदर्य प्रसाधनाची दुकाने संरक्षक भिंतीच्या आतील बाजूस व हॉटेल व्यावसायिकाना संरक्षक भिंतीच्या बाहेर जागा देण्यात आली आहे.
सोयी सुविधामुळे यात्रोत्सवाला नवीन रूप मिळाले असून परिसरात संपूर्ण काँक्र ीटिकरन, मंदिरालगत प्रवेशद्वार, सभामंडप, स्वतंत्र भक्तनिवास, पेव्हर ब्लॉक, पाण्याची टाकी, स्त्रीयांसाठी शौचालयाची कामे पूर्णत्वास गेली आहे. यासह ग्रामपंचायत व जगदंबा माता ट्रस्टने आलेल्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ सिस्टीम बसविला आहे. येवला ते कोटमगाव दरम्यान येवला नगरपालिका पथदीपाची व्यवस्था करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. (वार्ताहर)
सप्तशृंगगडावर नियोजन पूर्ण
वणी : सप्तशृंगगडावरील शारदीय नवरात्र उत्सवासाठी न्यास विश्वस्तानी नियोजनावर अखेरचा हात फिरविला असुन घटस्थापना दि १ आॅक्टोबर रोजी जिल्हा न्यायाधीश अरूण ढवळे यांचे हस्ते यथासांग पूजाविधिने संपन्न होणार आहे. ८ फुट उंचीची मूर्ती असलेल्या सप्तशृंगीला ११ वाराची विशेष पैठणी तसेच ३ मीटर चोळीचा पेहराव करण्यात येणार आहे डोक्यावर सोन्याचा मुकुट, कमरपटा, तोडे, कोयरी हार, गुलाबी हार, गाठले, मयुर हार, पुतळी हार, वजरटिक अशा सुवर्ण अलंकारांनी भगवतीला सुशोभीत करण्यात येणार आहे विशेष पंचामृत महापुजा प्रात आरती मध्यान्ह आरती व सायं आरती करण्यात येणार आहे. फुलांचे सुशोभिकरण व विशेष सजावटीचा फुलांचा हार भगवतीची शोभा वाढविणार आहे. घटस्थापना पूजाविधीस उपस्थीती मोठ्या प्रमाणावर राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे.

Web Title: The pace of preparations for Kottamgaon Jagdamba Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.