ओझरला तीन दुचाकी जळून खाक
By Admin | Updated: October 11, 2015 22:00 IST2015-10-11T21:59:19+5:302015-10-11T22:00:25+5:30
ओझरला तीन दुचाकी जळून खाक

ओझरला तीन दुचाकी जळून खाक
ओझर टाऊनशिप : येथील अधिकाऱ्यांच्या वसाहतीमधील घराजवळ उभ्या असलेल्या दोन मोटारसायकल व एक हिरो होंडा अॅक्टिवा अशी तीन वाहने अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. या दुचाकी कोणी जाळल्या की शॉटसर्किटमुळे आग लागली याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत.
शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास रवींद्र रमेश जर्दन, रा. टाईप ४ जी -२१ रक्षा नगर, ओझर टाऊनशिप यांनी त्यांच्या मालकीची क्रीस्टल मोटारसायकल (एमएच २० ईबी १८२८) व बजाज डिस्कव्हर (एमएच २८ वाय ६७८५) या दोन मोटारसायकल उभ्या होत्या. तसेच या दोन मोेटारसायकलीजवळ नवी अॅक्टिवादेखील उभी होती.
अचानक या तिन्ही वाहनांना आग लागली. त्यात तीनही वाहने जळून खाक झाली. या घटनेनंतर ओझर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझविली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय जे. बी. बंग, राजेंद्र देवरे करत आहेत.