ओझरला शेतकरी मेळावा
By Admin | Updated: July 24, 2014 00:57 IST2014-07-23T22:56:01+5:302014-07-24T00:57:46+5:30
ओझरला शेतकरी मेळावा

ओझरला शेतकरी मेळावा
ओझर : येथील कॅनॉल बागायतदार सहकारी संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त शेतकरी मेळावा घेण्यात आला.
सुरुवातीला सहकारमहर्षी कै. माधवराव बोरस्ते, कै. कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्णमहोत्सवाचे दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत अध्यक्ष माणिकराव बोरस्ते यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे म्हणाले, सद्यस्थितीत शासनाने म.रा.वि.मंडळ, जिल्हा परिषद, पंचायत समितीची बांधकामे, कार्यालये यांचे खासगीकरणाचा घाट घातलाच आहे. पण पुढे जाऊन हेच धरणे, नद्या, जंगले, तुरुंग व स्मशानभूमीचे खासगीकरण करण्यास मागे पुढे पाहणार नसल्याची खंत व्यक्त करीत शेतकरी बंधूंनी उभारलेला सहकार लढा संपणार नाही. शेती, शिक्षण, राजकारण, समाजकारण हे सबलीकरणाचे क्षेत्र समजून यात प्रगती करा, सहकारक्षेत्रात राजकारण येऊ देऊ नका. पाण्याबाबत परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी शेतकऱ्यांना पाण्याचे, जमिनीचे महत्त्व विशद करून त्याचे महत्त्व पटवून दिले. आमदार अनिल कदम, माजी आमदार दिलीप बनकर, नगरसेविका अश्विनी बोरस्ते, नीलिमाताई पवार, अॅड. भागीनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संचालक श्यामराव कदम, दौलतराव जाधव, दीपक बोरस्ते, निवृत्ती शिंदे, जगन्नाथ गवळी, आनंदराव बोराडे, सीताराम गायकवाड, अॅड. उत्तमराव मोगल, अंबादास चौधरी, संतू गुरगुडे, मोहन पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)