ओझरचे टर्मिनल झाले शोभेची वास्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:09 IST2017-09-28T23:34:47+5:302017-09-29T00:09:51+5:30
येथून जवळच असलेल्या शिर्डी विमानतळाचे एक आॅक्टोबरला लोकार्पण झाल्यानंतर येथे विमानसेवेला केव्हा प्रारंभ होईल, असा प्रश्न विचारला जात आहे. विमानसेवेसाठी तयार करण्यात आलेले येथील टर्मिनल शोभेची वास्तू झाल्याची चर्चा आहे.

ओझरचे टर्मिनल झाले शोभेची वास्तू
ओझर : येथून जवळच असलेल्या शिर्डी विमानतळाचे एक आॅक्टोबरला लोकार्पण झाल्यानंतर येथे विमानसेवेला केव्हा प्रारंभ होईल, असा प्रश्न विचारला जात आहे. विमानसेवेसाठी तयार करण्यात आलेले येथील टर्मिनल शोभेची वास्तू झाल्याची चर्चा आहे.
नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे एचएएल हा मिग विमानांचा कारखाना आहे. त्याला लागून एअरफोर्स स्टेशनदेखील आहे. या प्रकल्पांचा तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जेव्हा पाया रचला तेव्हाच येथे मिग विमानाच्या चाचण्यांसाठी धावपट्टी बनविण्यात आली. ही भारतातील काही निवडक मोठ्या धावपट्ट्यांमध्ये एक आहे. याला ओझर विमानतळ असे नाव पडले. एकीकडे कारखाना उदयास आल्यानंतर लढाऊ विमानांना लागणाºया वस्तू या थेट ओझर विमानतळावर परदेशातून येण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे धार्मिक राजधानी असलेल्या नाशिकला औद्योगिक वारसा लाभायला लागला. परिणामी मोठे कारखाने नाशिकला स्थायिक झाले आणि एकूणच द्राक्ष पंढरी म्हणूनही ओळख असलेल्या नाशिकला विमानसेवेचे वेध लागले. एरवी दिल्ली मुंबईहून येणाºया राजकीय नेत्यांना ओझर विमानतळशिवाय दुसरा पर्याय आजही नाही. परंतु जिल्ह्यातील सामान्य माणूस जो आज पुणे, मुंबई, नागपूरची उड्डाण्े पाहतोय. असे असताना दीर्घकाळ बंद असलेली सेवा दहा पंधरा वर्षांपूर्वी एअर डेक्कन कंपनीने ओझर-मुंबई विमानसेवा दिली. परंतु काही दिवसांत ती बंद पडली. पुढे अनेक वर्षे नगरीत सेवा बंदच होती. दरम्यानच्या काळात एचएएल आणि कोनकोर यांनी कार्गो सेवा सुरू केली. पुन्हा नागरी विमानसेवेचा उठाव सुरू झाला आणि किंगफिशरने पुन्हा सुरू केली होती. यामुळे अनेक स्थानिकांना रोजगारदेखील मिळाला होता. अनेक महिने चालल्यानंतर वेळ, दर, कनेक्टिव्हिटी व एकूण प्रवासी संख्या लक्षात घेता त्यांनीदेखील काढता पाय घेतला. यानंतर नाशिकच्या लोकांना मुंबई, पुणेशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी यासाठी प्रयत्न केले. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एचएएलशी समेट घडून आल्यानंतर जानोरी येथे टर्मिनलचे काम सुरू झाले. जिल्ह्यातील उद्योग, शेती, शैक्षणिक, सामाजिक संघटनांनी याचे स्वागत केले होते, परंतु लागलीच निवडणुका लागल्या व ओझरजवळील जानोरी येथील नाशिक विमानतळ शोभेची वास्तू झाली. आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नाशिकला देशाला जलद जोडण्याची गरज असताना अजून तरी त्याला रेड सिग्नल आहे हे स्पष्ट आहे, तर त्याला सुरू असलेल्या देखभालीचा विचार न केलेला बरा.