ओझरचे मुख्य प्रवेशद्वार सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:28 IST2020-04-06T21:24:51+5:302020-04-06T21:28:01+5:30
ओझर : सर्वत्र वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ओझर पोलिसांनी गावातील मुख्य रहदारी मार्ग व प्रमुख गर्दीचे ठिकाण बॅरिकेड्स लावून सील केले आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून पुन्हा जनता कर्फ्यूची आठवण ओझरकरांना आली.

ओझर येथील गडाख कॉर्नरजवळ बंद करण्यात आलेला मुख्य रस्ता.
ओझर : सर्वत्र वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ओझर पोलिसांनी गावातील मुख्य रहदारी मार्ग व प्रमुख गर्दीचे ठिकाण बॅरिकेड्स लावून सील केले आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून पुन्हा जनता कर्फ्यूची आठवण ओझरकरांना आली.
विशेष म्हणजे गडाख कॉर्नर, पाटील संकुल, चांदणी चौक येथे बॅरिकेड्स लावत रस्ता बंद केला आहे. गेल्या काही दिवसात दुचाकीस्वारांवर केलेली कारवाई बघता अद्यापदेखील अनेक दुचाकीस्वार कारण नसताना गावात फिरत असल्याने त्यांच्यावर निर्बंध घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. इतके होऊनदेखील नागरिकांनी सहकार्य न केल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा थेट इशारा ओझर पोलिसांनी दिला आहे.