ओझरचा कोरोना रु ग्णांचा आकडा ४७६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:48 IST2020-09-10T21:37:01+5:302020-09-11T00:48:18+5:30
ओझर : गेल्या चार दिवसांपासून ओझर परिसरात दररोज वीसहुन अधिक रु ग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायत मध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर येथील कामगार वसाहत असलेल्या ओझर परिसरातील ग्रामस्थ व टाऊनशिप मधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील नागरिक सोयीस्कर मार्ग म्हणून होम आयसोलेशनची मागणी रु ग्णांकडून करण्यात येत असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.

दिवसेंदिवस वाढणारी रु ग्णसंख्या आणि त्याच त्या पद्धतीने कामं यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य व तिला पूरक असलेली यंत्रणा हतबल झाली आहे. आता नागरिकही कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याने गेल्या महिन्यात आटोक्यात असलेली रु ग्णसंख्या गुरु वारी (दि.१०) एकाच वेळेस चोवीस रु ग्ण पॉझीटिव्ह आल्याने रु ग्ण संख्या ४७६ झाली आहे.
ओझरला वाढती रु ग्ण संख्या लक्षात घेता तातडीने कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करावी जेणेकरून तालुक्यात असलेले पिंपळगाव टेस्टटिंग लॅब यांच्यावरील ताण कमी होईल व ओझर व तालुक्यातील नागरिकांना तपासणी अत्यंत वेगात करून कोरोना आटोक्यात आणता येईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी मास्क वापरूनच घराबाहेर पडावे तसेच व्यापार्यांनी ग्रामपालिका ने ठरवून दिलेल्या वेळेतच दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू ठेवावी व प्रशासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षा आरोग्य यंत्रणेकडून केली जात आहे.
दररोज वाढत असलेल्या रु ग्ण संख्येमुळे ओझरला भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वांनी सतर्क राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी अनिल राठी यांनी केले आहे.
एकूण रु ग्ण - ४७६
मयत - १२
बरे झालेले - ३०२
सध्या उपचार सुरू - १७६
अॅडमिट रु ग्ण - १२७
होम कॉरंटाईन - ४९
प्रतिबंधक क्षेत्र -१०५