आठ वर्षांनंतर भरले ओझरखेड
By Admin | Updated: August 8, 2016 00:13 IST2016-08-08T00:12:58+5:302016-08-08T00:13:06+5:30
आठ वर्षांनंतर भरले ओझरखेड

आठ वर्षांनंतर भरले ओझरखेड
दिंडोरी : तालुक्यातील ओझरखेड धरण आठ वर्षानंतर जवळपास भरले असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद व्यक्त होत असून शेतकरी ओझरखेड धरण येथे येऊन नारळ फुले वाहत जलपूजन करत आहेत.
पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर भगरे, ओझरखेड सरपंच गंगाधर निखाडे, डॉ. योगेश गोस्वावी, शाम हिरे, कैलास झेडफळे, ऋषीकेश पडोळ, गणेश पाटील, योगेश चव्हाण आदींनी धरणाचे जलपूजन करत आनंद व्यक्त केला. गेल्यावर्षी धरणात अत्यल्प साठा असल्याने शेतकऱ्यांना शेतीचे आवर्तन मिळाले नव्हते यंदा धरण भरल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढला आहे. (वार्ताहर)